Mahamrutyunjay Mantra : अत्यंत प्रभावी आहे महामृत्युंजय मंत्र, नियम आणि फायदे

या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो. संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती. म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो.

Mahamrutyunjay Mantra : अत्यंत प्रभावी आहे महामृत्युंजय मंत्र, नियम आणि फायदे
शिवलींग
Image Credit source: Social Media
| Updated on: May 22, 2023 | 2:11 PM

मुंबई :  सनातन धर्मातील सर्व देवांमध्ये भगवान भोलेनाथांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांना देवांचा देव महादेव म्हणतात. कालांमध्ये शिव हा महाकाल आहे. त्यांच्या कृपेने सर्वात मोठे संकट किंवा काळही माणसाचे नुकसान करू शकत नाही. भगवान शंकराच्या अनेक चमत्कारिक मंत्रांचे वर्णन शास्त्रात करण्यात आले आहे. यातील एक महामृत्युंजय मंत्र आहे. जर तुम्हाला भयमुक्त, रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकराच्या सर्वात प्रिय ‘महामृत्युंजय मंत्राचा’ (Mahamrutyunjay Mantra) जप करा. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो. संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती. म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. शिवपुराणानुसार महामृत्युंजय मंत्राच्या जपाने जगातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. चला तर मग आज जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा हिंदी अर्थ आणि त्याचे महत्त्व.

महामृत्युंजय मंत्र

ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्।
उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर्मक्ष्य ममृतत् ॥

महामृत्युंजय मंत्राचा अर्थ

हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्व जण तुझी पुजा आराधना करतो.जो आमचे पोषण करतो,ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातुन मुक्त होत असतात.त्याचप्रमाणे आम्ही मृत्यु अणि नश्वरतेपासुन मुक्त होऊ. हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणारया मृत्युच्या विळख्यातुन आम्हास बाहेर काढ.अणि आम्हाला अमृतत्व प्रदान कर.आम्ही हा संसार सोडुन तुझ्या चरणाशी येऊ अणि अमर होऊ असा तु आम्हाला आशीर्वाद दे.

महामृत्युंजय मंत्राचा जप केव्हा व कसा करावा?

महामृत्युंजय मंत्राचा 1.15 लाख वेळा जप करावा. जर तुम्ही 1.25 लाख वेळा करू शकत नसाल तर तुम्ही 108 वेळा जप देखील करू शकता. श्रावण महिन्यात या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण या मंत्राचा जप इतर कोणत्याही महिन्यात करायचा असेल तर सोमवारपासून सुरुवात करा. या मंत्राचा जप करताना रुद्राक्षाची जपमाळ वापरावी.

महामृत्युंजय मंत्राचे फायदे

  • या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.
  • या मंत्राच्या जपाने भगवान शिव नेहमी प्रसन्न होतात आणि मनुष्याला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
  • महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने रोगांचा नाश होतो आणि मनुष्य रोगमुक्त होतो.
  • ज्या व्यक्तीला धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)