AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

विकट संकष्टी चतुर्थीला पूजेदरम्यान गणपतीला या आवडत्या गोष्टी व पदार्थ अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करतो. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा 'या' गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
Vikat Sankashti Chaturthi Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 05, 2026 | 2:47 PM
Share

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अत्यंत विशेष मानली जाते. कारण या तिथील‍ विघ्नहर्ता गणपती यांना समर्पित उपवास केला जातो. चैत्र महिन्यात येणारी पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी भगवान गणेशासाठी विशेष प्रार्थना आणि उपवास केले जातात. विकट हे भगवान गणेशाच्या आठ अष्टविनायक रूपांपैकी एक आहे. नावाप्रमाणेच ही चतुर्थी आयुष्यातील कठिण आणि विकट संकटांचा नाश करणारी मानली जाते.

असे मानले जाते की गणपती देवांच्या या रूपाची पूजा केल्याने ज्ञात आणि अज्ञात अशा सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्ती मिळते. शिवाय विकट संकष्टी चतुर्थीच्या पूजेदरम्यान गणपतीला काही प्रिय वस्तू अर्पण केल्या जातात. असा विश्वास आहे की पूजेदरम्यान या वस्तू गणपतीला अर्पण केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या खास गोष्टी गणपती बाप्पाला अर्पण करायच्या ते जाणून घेऊयात.

विकट संकष्टी चतुर्थी कधी आहे

विकट संकष्टी चतुर्थी तिथी 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 5‍ मिनिटांनी सुरू होते. आणि 6 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी संपते.

विकटा संकष्टी चतुर्थी 2026 पूजा शुभ मुहूर्त

विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेसाठी सर्वात शुभ वेळ सायंकाळी 06 वाजून 20 मिनिटं ते रात्री 08 वाजून 06 मिनिट हा अमृत काळ आहे.

विकटा संकष्टी चतुर्थीला चंद्र उगवण्याची वेळ

द्रिक पंचांगानुसार विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय रात्री09 वाजून 58 मिनिटांनी होईल.

या गोष्टी गणपती बाप्पाला अर्पण करा

पूजेदरम्यान बाप्पाला दुर्वा आणि लाल कुंकू अर्पण करायला विसरू नका. तसेच लाल किंवा पिवळे वस्त्र आणि जानवे देखील अर्पण करा. पूजेदरम्यान 21 दुर्वा अर्पण करा.

नारळ, अख्खी हळद आणि सुपारी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात. मोदक, बेसनचे लाडू आणि गोड पुरणपोळी यांसारखे त्याचे आवडते पदार्थ अर्पण करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?