रात्रीच्या वेळेस कपडे धुणे चांगले की नाही? काय होतो परिणाम?

वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे आणि सुकवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते, ज्यामुळे तुमच्या जीवनात धन-संपत्तीच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

रात्रीच्या वेळेस कपडे धुणे चांगले की नाही? काय होतो परिणाम?
रात्रीच्या वेळेस कपडे धुणे चांगले की नाही?
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 3:08 PM

मानवी जीवनात वास्तुशास्त्र खूप महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडवून आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीची प्रत्येक कृती ही वैश्विक ऊर्जेशी जोडलेली असते. रात्रीची ऊर्जा ही चंद्राची मानली जाते, जो त्याच्या शांती आणि शीतलतेसाठी ओळखला जातो. आजकाल अनेक लोकांना रात्री कपडे धुण्याची सवय आहे, परंतु वास्तुशास्त्रज्ञांच्या मते रात्री कपडे धुतल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक समस्या वाढतात.

कपडे धुणे हे एक सक्रिय काम मानले जाते. रात्री कपडे धुतल्याने ऊर्जेचा समतोल बिघडतो, ज्यामुळे जीवनात नकारात्मक परिणाम होतात. रात्री केवळ कपडे धुणेच नव्हे, तर ते सुकवणे देखील निषिद्ध आहे. रात्री कपडे बाहेर किंवा बाल्कनीत सुकत टाकल्याने रात्रीची नकारात्मक ऊर्जा त्यांच्यावर वास करते. नैऋत्य दिशेला कपडे सुकत टाकल्याने घरात वास्तू दोष निर्माण होऊ शकतात, कारण ही दिशा कपडे वाळवण्यासाठी शुभ मानली जात नाही. त्यामुळे आपली कामे अडकू लागतात. मन अशांत होते. आपल्याला तणाव जाणवू लागतो. जर काही कारणास्तव रात्री कपडे धुवावे लागले, तर ते उघड्यावर वाळवू नयेत. उघड्यावर कपडे वाळवल्याने त्यांना हानिकारक ऊर्जा मिळते.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार…

वॉशिंग मशीनचा वापर कपडे धुण्यासाठी केला जातो. वॉशिंग मशीन जलतत्त्वाशी संबंधित मानले जाते. रात्री वॉशिंग मशीन चालवल्याने घरातील ऊर्जा विस्कळीत होते. रात्री वॉशिंग मशीन चालवणे टाळावे, कारण रात्र ही शांततेची वेळ असते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार कपड्यांमुळे व्यक्तीची आभा विस्तारते. ओले कपडे रात्रीचा ओलावा शोषून घेतात. त्यामुळे अशी ऊर्जा असलेले कपडे परिधान केल्याने व्यक्तीची मानसिक शांती भंग पावते.

कपडे धुण्यासाठी सकाळची वेळ शुभ असते

सूर्यास्तानंतर किंवा रात्री साफसफाई केल्याने किंवा कपडे धुतल्याने घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी होतो आणि धनप्राप्तीच्या मार्गातही अडथळा येतो. जर तुम्हाला रात्री कपडे धुणे अत्यावश्यकच असेल, तर वॉशिंग मशीन वापरण्याऐवजी ते हाताने धुवा आणि भरपूर प्रकाश असलेल्या खोलीत वाळवा. तथापि कपडे धुण्यासाठी सर्वात शुभ वेळ म्हणजे पहाटेची. सूर्यप्रकाशात कपडे सुकवल्याने घरात सकारात्मकता येते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us