
वास्तुशास्त्रानुसार, घरात वास्तुदोष असल्यास व्यक्तीला अनेक संकेत मिळतात. याचे सर्वात जास्त संकेत मिळतात ते स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात काही वस्तूंच्या माध्यमातून घरातील वास्तुदोषाबद्दल समजतं. जसे की स्वयंपाकघरात काही वस्तू वारंवार घडत असतील तर हे घरात वास्तुदोष असल्याचे दर्शवते. वास्तुदोष असलेल्या व्यक्तीला आरोग्य, करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. असे म्हटले जाते की वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे घरगुती कलह देखील होऊ शकतो. स्वयंपाकघराशी देखील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वस्तू समस्या दर्शवतात. चला जाणून घेऊयात की तुमच्याबाबत देखील असं घडतं का?
वारंवार हातून मीठ सांडणे
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अन्न पडणे किंवा मीठ वारंवार सांडणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. ते जीवनात येणाऱ्या समस्या दर्शवते. तसेच ते वास्तुदोषाचे देखील संकेत दर्शवते.
वारंवार दूध सांडणे
वास्तुशास्त्रानुसार, वारंवार दूध सांडणे हे मानसिक आजार किंवा समस्या दर्शवते. स्वयंपाकघरात वारंवार दूध सांडणे अशुभ मानले जाते. हे घरातील वास्तुदोषांचे लक्षण असल्याचेही म्हटले जाते. तसेच घरात वाद विवाद होण्याची शक्यता असते.
स्वयंपाकघरात वाद होणे किंवा चिडचिड होणे
वास्तुनुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वयंपाकघरात प्रवेश केल्यानंतर चिडचिड होत असेल किंवा वाद घालण्याची इच्छा होत असेल तर ते घरात नकारात्मकतेचे लक्षण असू शकते. असे म्हटले जाते की अशा परिस्थितीत वास्तु तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण अशा परिस्थितीत खरोखरंच तुमच्या घरात वास्तूदोष, नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता असते.
मोहरीचे तेल सांडणे
वास्तुनुसार, स्वयंपाकघरात मोहरीचे तेल सांडणे चांगले मानले जात नाही. हे शनि ग्रहाशी संबंधित समस्या दर्शवू शकते.
वारंवार दूध नासने
वास्तुशास्त्रानुसार, वारंवार दूध नासणे हे चंद्राशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही वास्तु तज्ज्ञांच्या सल्ला घेऊन काही उपाय करू शकता.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)