तुम्ही काय शॉपिंग करता तेदेखील विधिलिखीत असतं, कोणत्या राशीच्या व्यक्ती काय खरेदी करतात?

| Updated on: Apr 03, 2021 | 4:03 PM

तुमच्या राशीचक्रांवर तुमची आवड निवड अवलंबून असते. हाच नियम किराणा सामान खरेदी करतानाही लागू होतो. (buy grocery according to zodiac signs)

तुम्ही काय शॉपिंग करता तेदेखील विधिलिखीत असतं, कोणत्या राशीच्या व्यक्ती काय खरेदी करतात?
प्रातनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : आपण दैनंदिन आयुष्यात कधी ना कधी तरी मॉलमध्ये जातो. त्यावेळी कपड्याची शॉपिंग करण्यापलीकडे घरातील काही किराणा सामानही खरेदी करतो. हे सामान घेण्यापूर्वी आपण त्याची एक यादी करतो. त्या यादीनुसार आम्ही आमच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या राशीचक्रांवर तुमची आवड निवड अवलंबून असते. हाच नियम किराणा सामान खरेदी करतानाही लागू होतो. म्हणजे तुम्ही किराणा सामान खरेदी करताना तुमच्या राशीनुसार किराणा खरेदी करु शकता. (buy grocery according to zodiac signs)

मेष

मेष राशीत जन्मलेले लोक शांत आणि संयमी आहेत. त्यांचा हा स्वभाव किराणा सामान खरेदी करण्याच्या सवयींवर दिसून येतो. या राशीचे लोक किराणा सामान खरेदी करताना बहुतेक वेळा आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स किंवा थंड पदार्थ खरेदी करतात.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना महागड्या वस्तूंची फार आवड असते. ते जेवणाचे फार शौकिन असतात. मात्र स्वत: जेवण बनवून खाणे त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते रेडी टू कूक असे पदार्थ खरेदी करतात. यात रेडीमेड पास्ता, मॅगी, सॉस किंवा डबाबंद वस्तू खरेदी करतात. त्यांना नेहमीच चविष्ट, चमचमीत खाण्याची सवय असते.

मिथुन

मिथुन राशिच्या लोकांना स्वयंपाक करणे, नवनवीन गोष्टींचा वापर करणे फार आवडते. त्यातही बहुतेक वेळा परदेशी पदार्थांचा वापर जास्त असतो. यामुळे या राशीच्या लोकांच्या किराणा सामानात परदेशी पदार्थ दिसतात. ज्यामुळे त्यांचे किचन हे सर्वात वेगळे दिसते. तसेच ते नेहमी चांगले चविष्ट जेवण बनवण्याचा प्रयत्न करतात.

कर्क

इतर राशींपेक्षा कर्क राशीचे लोक खरेदी करताना अतिरिक्त किंवा अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळतात. या प्रकारची लोक सांसारिक असतात. ते त्यांच्या किराणा यादीच्या पलीकडे एकही वस्तू खरेदी करत नाही. पण त्यांच्या किराणा सामानात घरातील प्रत्येक सदस्याचे आवडते खाद्यपदार्थ नक्की असतात.

सिंह

सिंह राशीचे लोक बोल्ड, उग्र आणि मसाल्यासारखे असतात. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच किराणा खरेदी दरम्यान मिरची, मसाला आणि चिली सॉस यासारख्या मसालेदार पदार्थ खरेदी करण्यावर भर देतात. त्यांच्याकडे अनेकदा मसालेदार स्नॅक्स आणि साहित्य असते. (buy grocery according to zodiac signs)

कन्या

कन्या राशीचे लोक हे मूळ व्यावहारिक असतात. ते पैसे वाचविण्यात तरबेज असतात. ते कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक वस्तूची किंमत दोनदा तपासतात. या राशीचे लोक स्वस्त किंमत असलेल्या किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या वस्तू खरेदी करतात.

तूळ 

तूळ राशीचे लोक आरोग्याबद्दल जागरूक असतात. ते नेहमी संतुलित आहार घेणे पसंत करतात. त्यामुळे तूळ राशीच्या किराणा सामानात अनेकदा हिरव्या पालेभाज्या, फळे, शेंगदाणे किंवा कमी कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो.

वृश्चिक 

वृश्चिक राशीचे लोक तीव्र आणि खोल विचार करणारे असतात. वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने भावूक असतात. त्यामुळे ते डार्क चॉकलेट, अंजीर, ब्लॅकबेरी यासारख्या वस्तू खरेदी करण्यावर भर देतात.

धनू

धनू राशीच्या लोकांना नेहमी सर्वांच्या पुढे राहणे आवडतं. त्यामुळे ते नेहमी उर्जा मिळेल असे पदार्थ खाणे पसंत करतात. त्यांच्या सामानात नेहमीच प्रोटीन बार, एनर्जी ड्रिंक आणि ग्रॅनोला बार यासारख्या खाद्यपदार्थ असतात.

मकर

मकर राशीचे लोक निरोगी खाणे पसंत करतात. ते नेहमी खाताना तब्येतीप्रमाणे शुगर लेव्हलचाही विचार करतात. त्यामुळे ते फळ, केळी यासारख्या वस्तू खरेदी करतात. जे पोटासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.

कुंभ

कुंभ राशीचे लोकांना विविध पदार्थ बनवण्याची फार हौस असते. त्यामुळे त्यांच्या सामानात विविध प्रकारचे साहित्य असते. त्यात देशी तसेच विदेशी खाद्यपदार्थांचा समावेश असतो. विशेष म्हणजे ते विविध दुकानातून वस्तू खरेदी करतात.

मीन

मीन राशीचे लोक कलात्मक, सर्जनशील आणि काल्पनिक विश्वात वावरणारे असतात. त्यांना नेहमी रंगीबेरंगी खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. ते नेहमी रंगेबेरंगी पदार्थ खाणे पसंत करतात.  (buy grocery according to zodiac signs)

संबंधित बातम्या : 

‘हे’ संकेत दिसले तर समजा तुमच्यावर शनिचा प्रकोप, ‘या’ उपायांनी होणार बचाव…

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…