
Dussehra 2025 date: हिंदू धर्मात दसरा या सणाचं फार महत्त्व आहे. भारतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणलं. म्हणून, हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो.
सांगायचं झालं तर, दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात. 2025 मध्ये दसऱ्याच्या तारखेबाबत लोकांमध्ये गोंधळ आहे. दसऱ्याची नेमकी तारीख आणि तो कधी साजरा केला जाईल याबद्दल जाणून घेऊया.
पंचांगानुसार, 2025 च्या दसऱ्यातील आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी खालीलप्रमाणे आहे:
दशमी तिथीची सुरुवात: 01 ऑक्टोबर 2025, बुधवार, दुपारी 12:12 वाजता
दशमी तिथी समाप्त: 02 ऑक्टोबर 2025, गुरुवार, दुपारी 01:13 वाजता
यंदाच्या वर्षी दसरा गुरुवार 02 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
विजय मुहूर्त (Shubh Muhurat for Dussehra Puja)
विजय मुहूर्त प्रारंभ: दुपारी 01:57 वाजता
विजय मुहूर्त समाप्त: दुपारी 02:44 वाजता
अवधी: 47 मिनिटं
दसऱ्याच्या दिवशी मुहूर्तावर पूजा करणं आणि शस्त्रांची पूजा करणं विशेषतः फलदायी मानलं जातं.
सत्याचा असत्यावर विजय: या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून धर्माचं रक्षण केलं.
आई दुर्गेचा विजय दिवस: नवरात्रीनंतर या दिवशी, आई दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.
जीवनात विजय आणि यश टिकून राहावे म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्रे आणि हत्यारांची पूजा करण्याची परंपरा आहे. एवढंच नाही, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही शुभ कार्याची देखील सुरुवात करु शकता. ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल…
दसऱ्याच्या दिवशी, रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचे पुतळे तयार केले जातात आणि विविध ठिकाणी जाळले जातात. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानलं जातं. रावण दहन पाहण्यासाठी लोक उत्साहाने जत्रांमध्ये जातात. दसर्याला आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे, ज्यात पानांना ‘सोनं’ समजून एकमेकांना दिले जाते