AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटतात? जाणून घ्या या परंपरे मागची रंजक कथा

Dasara 2026: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन ‘सोनं घ्या, सोन्यासारखे रहा’ असे म्हणण्याची परंपरा आहे. पण साध्या आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक का मानले जाते आणि ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा.

दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटतात? जाणून घ्या या परंपरे मागची रंजक कथा
DasaraImage Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 17, 2026 | 3:14 PM
Share

दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि सुख-समृद्धीची नवी सुरुवात. दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी रावण दहन, रामलीला असते तर महाराष्ट्रात या दिवशी एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा दिल्या जातात. हे सोनं म्हणजे आपट्याची पानं. या दिवशी लोक नातेवाईक, मित्रमंडळी, शेजाऱ्यांना आपट्याची पानं देतात आणि ‘सोनं घ्या, सोन्यासारखे रहा’, अशा शुभेच्छा दिल्या जातात. ही फक्त परंपरा नाही तर एकमेकांच्या भेटीगाठी, शुभेच्छा देणे, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे आणि आपुलकी व्यक्त करण्याची पद्धत आहे. पण साध्या हिरव्या पानांना सोन्याचे प्रतीक का मानले जाते, हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा आहे.

आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्यामागे कथा

प्रचलित लोककथेनुसार, कौत्स नावाचा एक विद्वान आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरू वरतंतू यांना गुरुदक्षिणा देऊ इच्छित होता. त्यासाठी गुरूंनी त्याच्याकडे १४ कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुवर्णमुद्रा मिळवणे कौत्सासाठी शक्य नव्हते. त्यामुळे तो मदतीसाठी राजा रघू यांच्याकडे गेला. राजा रघू हे दानशूर म्हणून प्रसिद्ध होते; मात्र त्यावेळी त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती दान केलेली होती.

कौत्साला मदत करण्यासाठी राजाने धन देवता कुबेर यांची मदत मागितली. लोक कथेनुसार, त्यानंतर आपटा आणि शमीच्या वृक्षांशी संबंधित सुवर्णमुद्रांची घटना घडली. कौत्साने आवश्यक त्या सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि उर्वरित संपत्ती लोकांमध्ये वाटण्यात आली.

आपट्याची पाने देण्यामागचा अर्थ काय?

सोनं हे धन, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देऊन सुख, भरभराट आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. या परंपरेत महागड्या भेटवस्तू देण्याची गरज नसते. साधेसे पानही प्रेम, आपुलकी आणि सदिच्छा व्यक्त करण्याचे माध्यम बनते. आपट्याची पाने देताना ‘सोनं घ्या, सोन्यासारखे रहा’ असे म्हटले जाते. याचा भावार्थ म्हणजे समृद्धी लाभो आणि आपले जीवन सोन्यासारखे सुंदर होवो, असा आहे.

दसऱ्याला का केली जाते शमीच्या झाडाची पूजा?

दसऱ्याच्या परंपरेत आपट्याच्या पानांबरोबरच शमीच्या वृक्षालाही महत्त्व आहे. महाभारतातील मान्यतेनुसार, पांडवांनी अज्ञात वासाच्या काळात आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी ही शस्त्रे परत मिळवली आणि पुढे युद्धात विजय मिळवला. या कथेमुळे शमीच्या वृक्षाला विजय, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल