AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा झाला पॅचअप, करणार लग्न? Viral Videoने खळबळ

Viral video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनाचे कुटुंबीय आणि पलाश मुच्छलचे कुटुंबीय एकत्र असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाश पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा झाला पॅचअप, करणार लग्न? Viral Videoने खळबळ
Smriti MandhanaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 08, 2026 | 12:06 PM
Share

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी सांगलीमधील फार्महाऊसवर सर्व तयारी करण्यात आली होती. प्री-वेडिंग फंक्शन्सही पार पडले होते. पण लग्नाच्या काही तास आधी त्यांचे लग्न मोडले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समोर आले होते. नंतर समजले की, लग्नापूर्वी स्मृतीने पलाशला फसवले होते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन पलाश आणि स्मृतीमध्ये सर्व काही ठिक झाल्याचे वाटत आहे.

पलाश-स्मृती पुन्हा एकत्र येणार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधानाचे वडील पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छल आणि तिचे पती मिथुन यांच्यासोबत दिसत आहेत. व्हिडिओ पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये. या व्हिडीओत स्मृतीचे वडील आणि पलक मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले. पलक त्यांच्या पायाला स्पर्श करते. ते गायिकेला आशीर्वाद देत निघून जातात. व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. युजर्सचा विश्वास आहे की दोन्ही कुटुंबांमध्ये सर्व काही ठीक झाले आहे. कोणी म्हणाले की पलाश आणि स्मृती पुन्हा एकत्र येणार आहेत. अनेक जण आश्चर्याने विचारत आहेत हे काय आहे, हे कसे झाले?

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

काही युजर्सनी हे व्हिडीओ फेक असल्याचे सांगितले, तर काहींनी तो जुना व्हिडीओ असल्याचे म्हटले. आता पलक आणि स्मृतीच्या वडिलांचा हा व्हिडीओ जुना आहे की नवीन, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण एवढे नक्की आहे की या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.

लग्न का तुटले होते?

पलाश आणि स्मृती २५ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न करणार होते. ते आयडल कपल बनले होते. पण लग्नाच्या एक दिवस आधी सिंगरला दुसऱ्या एका महिलेसोबत होता. स्मृतीसोबत राहत असतानाही पलाशचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे स्मृतीने लग्नास नकार दिला. मात्र, पलाशने या फसवणुकीच्या आरोपांना नेहमीच नाकारले आहे. त्यावेळी पलाशला जोरदार ट्रोल करण्यात आले होते. युजर्सनी स्मृतीला मनापासून प्रेम आणि सहानुभूती दिली होती. या प्रकरणावर स्मृतीने आजतागायत मौन बाळगले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...