AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs DC : ऋषभ पंत-संजीव गोयनका यांच्यात वाजलं का? पहिल्याच मॅचमधील पराभवानंतर LSG च्या कॅम्पमध्ये मोठ्या घडामोडी VIDEO

LSG vs DC IPL 2026 : आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. पावरप्लेमध्ये चार विकेट गमावूनही दिल्लीच्या टीमने मॅचमध्ये दमदार पुनरागमन केलं.

LSG vs DC : ऋषभ पंत-संजीव गोयनका यांच्यात वाजलं का? पहिल्याच मॅचमधील पराभवानंतर LSG च्या कॅम्पमध्ये मोठ्या घडामोडी VIDEO
Rishabh Pant-Sanjeev GoenkaImage Credit source: Screengrab/@JioHotstar
| Updated on: Apr 02, 2026 | 11:41 AM
Share

लखनऊ सुपर जायंट्ससाठी इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या सीजनची सुरुवात निराशाजनक झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने लखनऊच्या टीमला 6 विकेटने हरवलं. लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकट स्टेडियममध्ये ही मॅच झाली. या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 142 धावांचं टार्गेट दिलं होतं. टी20 क्रिकेटमधील हे खूप कमी टार्गेट आहे. दिल्ली कॅपिटल्स टीमची सुरुवात खूप खराब झाली. त्यांनी अवघ्या 26 रन्समध्ये 4 विकेट गमावले होते. सामना एकतर्फी होईल असं वाटत होतं. पण समीर रिजवी आणि ट्रिस्टन स्टब्सने कमाल केली. दोघांनी आधी दिल्लीचा डाव संभाळला. मग लखनऊच्या गोलंदाजांवर पलटवार करताना 119 धावांची मॅचविनिंग पार्टनरशिप केली.

इम्पॅक्ट सब म्हणून आलेल्या समीर रिजवीने 47 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स 32 चेंडूत नाबाद 39 धावांची महत्वाची इनिंग खेळला. दिल्लीने या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर 17.1 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. मॅच संपल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स टीमचे मालक संजीव गोयनका, कॅप्टन ऋषभ पंत आणि कोच जस्टिन लँगर मैदानावर गंभीर चर्चा करताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत गोयनका दोघांना काहीतरी सांगताना दिसले. ऋषभ पंत आपली बाजू सांगत होता. ही चर्चा पाहिल्यानंतर फॅन्सनी वेगवेगळे अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे. ही रणनिती संदर्भात चर्चा सुरु होती की नाराजी. याचा अंदाज लावण कठिण आहे.

तेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं

गोलंदाजीत लखनऊ सुपर जायंट्सने चांगली सुरुवात केली. लखनऊ सुपर जायंट्ससाठी डेब्यू करताना मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर मोहसिन खान आणि प्रिन्स यादव यांनी आणखी विकेट काढून दिल्लीच्या टीमला बॅकफूटवर ढकललं. पण त्यानंतर लखनऊच्या गोलंदाजांना सामन्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही. तेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा