AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : कॉमेन्ट्रीमधून भल्याभल्यांना क्रिकेट शिकवणारा आकाश चोप्रा जेव्हा ब्रेट ली च्या बोलिंगवर चळचळा कापतो!

आकाश चोप्रा अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या कॉमेंट्रीमधून क्रिकेट शिकवतो. पण याच आकाश चोप्राचा सामना ब्रेट ली शी झाला होता, जेव्हा त्याची भलतीच तारांबळ उडाली होती. (Akash Chopra Vs Brett lee Face Off Video goes Viral on Social Media)

Video : कॉमेन्ट्रीमधून भल्याभल्यांना क्रिकेट शिकवणारा आकाश चोप्रा जेव्हा ब्रेट ली च्या बोलिंगवर चळचळा कापतो!
आकाश चोप्रा विरुद्ध ब्रेट ली
| Updated on: May 23, 2021 | 3:12 PM
Share

मुंबई : आकाश चोप्रा (Akash Chopra)… भारतीय क्रिकेट समालोचकांमधलं आघाडीचं नाव… जो की भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर देखील राहिलेला आहे. आकाश चोप्राने अत्यंत कमी काळात आपल्या कॉमेंट्रीने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलंय. मैदानात आक्रमक फटके मारणारे खेळाडू आणि आकाश चोप्राची जादूई कॉमेंट्री असं जर मिश्रण असेल तर मॅच पाहण्याची मजा काही वेगळीच असते… आकाश चोप्रा अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या कॉमेंट्रीमधून क्रिकेट शिकवतो. त्यांनी कसा चुकीचा फटका खेळला, हा फटका कसा खेळायला हवा होता, अशी अनेक वर्णनं तो कॉमेन्ट्रीमधून करतो पण याच आकाश चोप्राची ऑस्ट्रेलियाचा महान बोलर ब्रेट ली समोर धांदल उडाली होती. ब्रेट ली च्या बोलिंगवर खेळताना आकाश चोप्रा किती अडचणीत सापडला होता, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Akash Chopra Vs Brett lee Face Off Video goes Viral on Social Media)

व्हिडीओ कधीचा आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 2004 सालचा आहे. सौरभ गांगुलीच्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका कसोटी सामन्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग हे मैदानात उतरले. यावेळी एका ओव्हरदरम्यान ब्रेट ली आणि आकाश चोप्रा आमने-सामने आले होते.

ब्रेट ली ने आकाश चोप्राला कसं अडचणीत आणलं?

ब्रेट ली चा पहिला बॉल खेळताना आकाश चोप्रा अडचणीत आला. ब्रेट ली चा पहिलाच वेगवान चेंडू आकाशला काही कळण्याच्या आत निघूनही गेला. ब्रेटने दुसरा बॉल टाकला, आकाश चोप्राच्या बॅटची कड लागून तो बोल थेट विकेट कीपर गिलख्रिस्टच्या हातात गेला. परंतु तो नो बॉल आहे, असा इशारा अंपायरने केला. आकाश चोप्राला जीवनदान मिळालं.

ब्रेटने पुन्हा तिसरा बॉल टाकला. आकाश चोप्राने तो बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बॅटची पुन्हा कड घेउन चेंडू स्लीपमध्ये उभ्या असलेल्या सायमन कॅटिचकडे गेला पण तो सोपा झेल त्याच्या हातातून सुटला. अशाप्रकारे लागोपाठ दोन बॉलमध्ये आकाश चोप्राला दोन वेळा जीवनदान मिळाले.

यानंतरच्या चेंडूवर आकाश चोप्राने थोडंसं दडपण हटविण्याचा प्रयत्न केला. ब्रेट ली ला लेग साईडला त्याने एक शानदार चौकार मारला. पुन्हा पुढच्या चेंडूवर आकाश चोप्रा अडखळताना दिसला. पुढचा चेंडू ब्रेट लीने सुंदर बाउंसर टाकला. आकाश चोप्राने तो बॉल सोडून दिला. अशा प्रकारे एका ओव्हरमध्ये ब्रेटली समोर आकाश चोप्राची किती तारांबळ उडाली होती हे या व्हिडीओवरुन दिसून येतं.

नेटकऱ्यांच्या अनेक चित्र विचित्र कॉमेंट

ब्रेटची ही ओव्हर आकाश चोप्रा कधीच विसरणार नाही. कारण ब्रेटच्या या ओव्हरमध्ये आकाश चोप्रा चांगलाच अडचणीत आला होता. ब्रेटसमोर आकाश चोप्राची उडालेली तारांबळ पाहून नेटकरी अनेक चित्र विचित्र कॉमेंट करत आहेत.

(Akash Chopra Vs Brett lee Face Off Video goes Viral on Social Media)

हे ही वाचा :

“भारतातील बायोबबल सुरक्षित नव्हतं म्हणूनच खेळाडू आणि स्टाफला कोरोनाची लागण”

धोनी, विराट आणि रोहितचं एका शब्दात वर्णन, सुर्यकुमार यादवची धमाकेदार उत्तरं!

वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.