वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?

इंग्लंडचे महान फलंदाज ग्रॅम हिक ( Graeme Hick) यांच्या क्रिकेट कारकर्दीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. (Former England Cricketer graeme hick birthday today)

वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?
Graeme Hick

मुंबई : या फलंदाजाने 22 यार्डाच्या पीचवर काय काय नाही केलं… एका डावामध्ये या फलंदाजांने 405 धावांचा पर्वताएवढा स्कोअर केला. फक्त वीस वर्षांचा असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला. 32 वर्षांचा होईपर्यंत 100 शतके ठोकली. क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजारहून अधिक धावा केल्या. आज आपण अशा फलंदाजाविषयी बोलतोय ज्याची नोंद जागतिक क्रिकेटमध्ये घेतली गेली. इंग्लंडचे महान फलंदाज ग्रॅम हिक ( Graeme Hick) यांच्याबद्दल आपण बोलतोय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी जाणून घेणार आहोत… (Former England Cricketer Graeme Hick birthday today)

सहा फूट तीन इंचाच्या मधल्या फळीतील फलंदाज ग्रेम हिक यांचा जन्म 23 मे 1966 रोजी हरारे या शहरात झाला. त्यांचं सगळं कुटुंब तंबाखूची शेती करत होतं. सुरुवातीच्या काळात ते त्यांच्या नॅशनल स्कूलकडून हॉकी खेळायचे. मात्र हॉकीचा खेळ सोडून त्यांचे पाय क्रिकेटच्या मैदानाकडे वळले. मजेदार गोष्ट ही की सुरुवातीला ते बॉलिंग करायचे नंतर त्यांनी बॅट हातात धरली ती कायमचीच… 7 ऑक्टोबर 1983 शाली वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

जिम्बाब्वेला रामराम, इंग्लंडच्या संघात दाखल

ग्रॅम हेक 1984 साली झिंबाब्वे क्रिकेट यूनियनच्याच्या स्कॉलरशिप अंतर्गत इंग्लंडमध्ये आले. इथे येऊन त्यांनी कौंटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 1983 शाली ते झिंबाब्वे संघाचा हिस्सा होते. मात्र तीन वर्षानंतर 1986 सालापर्यंत झिम्बाब्वे संघाला कसोटी क्रिकेटचा राष्ट्रीय दर्जा मिळाला नव्हता आणि भविष्यातही तशी आशा त्यांना दिसत नव्हती. त्यामुळे त्यांना मोठा निर्णय घ्यावा लागला. इंग्लंडकडून खेळण्याचा त्यांनी मोठा निर्णय घेतला. शेवटी 1991 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांना तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली.

ग्राहम गुच्छ आणि सचिन तेंडुलकरनंतर तिसरे फलंदाज….

ग्रॅम हिक यांच्या कारकिर्दीचा अंदाज तेव्हा येतो जेव्हा लिस्ट क्रिकेटमध्ये 20 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्यांचा तिसरा नंबर लागतो. या यादीमध्ये ग्राहम गुच्छ आणि सचिन तेंडुलकर या दोन दिग्गज खेळाडूंची नावं आहेत आणि तिसऱ्या फलंदाज नाव आहे ग्रॅम हिक… जगभरातील 25 फलंदाज ज्यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 शतक आहेत. या सगळ्यांमध्ये ग्रॅम हिक असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन वेगवेगळ्या दशकात तीन तिहेरी शतक आहेत.

आकडे  वाचून वेड लागेल…!

ग्रेम हिक यांनी आपल्या करिअरमध्ये 65 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये 31.32 च्या सरासरीने सहा शतक आणि 18 अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी 3383 धावा केल्या. दुसरीकडे 120 एकदिवसीय सामन्यात 37.3 सरासरीने त्यांच्या नावावर 3 हजार 886 नावांची नोंद आहे. यामध्ये त्यांनी 5 शतक आणि 27 अर्धशतके ठोकली.

526 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 52. 20 च्या सरासरीने त्यांच्या नावावर 41 हजार 112 रन्स आहेत. यामध्ये 405 हा त्यांचा सर्वाधिक स्कोअर आहे. यामध्ये 136 शतके आणि 158 अर्धशतकं त्यांनी ठोकली आहेत.

651 लिस्ट ए मॅचेसमध्ये देखील त्यांनी भाग घेतला. यामध्ये 41.3 च्या सरासरीने 40 शतक आणि 139 अर्धशतक त्यांनी ठोकली. 22 हजार 59 रन्सची नोंद त्यांच्या नावावर आहे. यामध्ये 172 धावा हा त्यांचा सर्वाधिक स्कोअर आहे. हिक यांनी 37 टी ट्वेन्टी मॅचेस देखील खेळल्या. यामध्ये 36. 39 सरासरीनं 1201 धावा त्यांच्या नावावर आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. हिक यांनी 2008 साली प्रथम श्रेणी क्रिकेटला गुडबाय केलं.

(Former England Cricketer graeme hick birthday today)

हे ही वाचा :

कसोटी क्रिकेटमध्ये मोजक्या संधी, माजी सिलेक्टर्सवर युवराज सिंह भडकला, ट्विट करुन म्हणाला….

भारताचा तो क्रिकेटर ज्याच्या 3 मॅचमध्ये 30 विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक, नंतर सगळ्यांसमोर लाज आणली!

‘विराट’ नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारा खास व्यक्ती काळाच्या पडद्याआड!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI