“भारतातील बायोबबल सुरक्षित नव्हतं म्हणूनच खेळाडू आणि स्टाफला कोरोनाची लागण”

आयपीएलचं तेरावं पर्व जसं दुबईत खेळलं गेलं तसं यावर्षीदेखील आयपीएलचं आयोजन दुबईमध्ये झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं, असं वृद्धिमान साहा म्हणाला. (Wridhhiman Saha question Bio Bubble IPL 2021)

"भारतातील बायोबबल सुरक्षित नव्हतं म्हणूनच खेळाडू आणि स्टाफला कोरोनाची लागण"
Wriddhiman Saha

मुंबई : कोरोना व्हायरसने मैदानात केलेला एन्ट्रीमुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. या दरम्यान अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. तसंच सपोर्ट स्टाफमधीलही काही लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. खेळाडू आणि स्टाफला कोरोनाची लागण होण्याला भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळाणारा विकेट कीपर फलंदाज वृद्धिमान साहाने (Wridhhiman Saha) भारतातील बायोबबलला दोषी ठरवंलं आहे. भारतातील बायोबबल सुरक्षित नव्हतं म्हणूनच खेळाडू आणि स्टाफला कोरोनाची लागण, असं तो म्हणाला आहे. (Wridhhiman Saha question Bio Bubble IPL 2021)

तर आयपीएलचं पर्व स्थगित करावं लागलं नसतं

आयपीएलचं तेरावं पर्व जसं दुबईत खेळलं गेलं तसं यावर्षीदेखील आयपीएलचं आयोजन दुबईमध्ये झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं. त्यामुळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोनाच्या विळख्यात सापडला नसता आणि आयपीएलचं पर्व देखील स्थगित करावं लागलं नसतं. दुबईतल्या बायोबबलच्या तुलनेत भारतातला बायोबबल सुरक्षित नव्हता, असं वृद्धिमान साहा म्हणाला.

मला आठवतंय पाठीमागच्या वर्षी दुबईमध्ये आयपीएल किती आरामशीर खेळले गेलं. ज्या वेळी भारतात कोरोनाचा कहर सुरु होता. आत्ता यावर्षी मैदानावर अनेक कर्मचारी काम करत होते. त्यांचा संपर्क या ना त्या कारणाने खेळाडूंशी येत होता. मी अधिक काही बोलू इच्छित नाही फक्त एवढंच सांगू इच्छितो भारतापेक्षा दुबईत जर आयपीएलचं आयोजन झालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं, असं साहा म्हणाला.

साहाला दोन वेळा कोरोनाची लागण

वृद्धीमान साहाला दोन वेळा कोरोनाची लागण झाली. एकदा आयपीएलदरम्यान त्याला कोरोनाने ग्रासलं.  4 मे रोजी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आढळला होता. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी तो आयसोलेट झाला होता. साहाच्या कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पुढे ढकलण्यात आला आणि संपूर्ण संघ क्वारंटाईन करण्यात आला होता.

भारतीय संघाला दिलासा

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये साहाचाही समावेश आहे. इंग्लंडला रवाना होण्यासाठी विराटसेनेला मे अखेरीस मुंबईत एकत्र व्हायचे आहे. साहा लवकरच मुंबईत इंग्लंडला जाण्यासाठी टीम इंडियाच्या ताफ्यात सामिल होईल.

साहाने जवळपास 15 दिवस कोरोनाशी झुंज दिली. डॉक्टरांच्या  निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु होते. हळूहळू त्याची प्रकृती पूर्वपदावर येत होती. अखेर सोमवारी त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आलाय. साहाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

साहाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे साहाचे कुटुंबीय घाबरले होते. चिमुकल्या लेकीने साहाला बरं वाटावं म्हणून खास संदेश पाठवला. तो संदेश वाचून वृद्धिमान साहाला गहिवरायला झालं. सध्याच्या प्रसंगी हीच माझी संपूर्ण दुनिया आहे. मियाने बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे आभार!

ऋद्धिमान साहा केवळ 2 सामने खेळला

आयपीएलच्या 14 व्या पर्वात साहा केवळ 2 सामने खेळला. साहा सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना विकेट कीपिंग तसंच डावाची सुरुवात करतो. सध्या साहाचा फॉर्म ठीक नाहीय. त्यामुळे संघाने त्याला अंतिम 11 मधून वगळलं होतं. परंतु यंदाच्या मोसमात त्याने 2 सामने खेळले होते.

(Wridhhiman Saha question Bio Bubble IPL 2021)

हे ही वाचा :

धोनी, विराट आणि रोहितचं एका शब्दात वर्णन, सुर्यकुमार यादवची धमाकेदार उत्तरं!

जेव्हा धनश्री आणि युजवेंद्रमध्ये विराट कोहली आला, काय आहे फोटोमागची कहाणी?

वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI