AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshar Patel : त्या जबरदस्त कॅचने मॅच पलटणारा अक्षर पटेल इतक्या कोटी संपत्तीचा मालक; कोण आहे पत्नी?

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने रोमहर्षक विजय मिळवला. संजू सॅमसनची 89 धावांची शानदार खेळी चर्चेचा विषय ठरला होता. परंतु खरा हिरो हा अक्षर पटेल होता, ज्याने उत्कृष्ट बॉलिंग आणि फिल्डिंगद्वारे टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

Akshar Patel : त्या जबरदस्त कॅचने मॅच पलटणारा अक्षर पटेल इतक्या कोटी संपत्तीचा मालक; कोण आहे पत्नी?
Akshar PatelImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2026 | 10:16 AM
Share

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघने इंग्लंडविरोधात रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात फिल्डिंगमधील फरक निर्णायक ठरला. कारण एकीकडे संजू सॅमसनला जीवदान देणं इंग्लंडला महागात पडलं. तर दुसरीकडे आव्हानाचा पाठलाग करताना बेथल आणि जॅक्स जोडी घातक ठरत होती, तेव्हा सीमारेषेवर अक्षर पटेलच्या चपळाईमुळे भारतीय संघाला जॅक्सला बाद करता आलं. अक्षय पटेलच्या कॅचची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. उत्कृष्ठ फिल्डिंग आणि गोलंदाजीने त्याने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून वाचवलं. या मॅचनंतर सोशल मीडियावर अक्षर पटेल विशेष प्रकाशझोतात आला असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

अक्षर पटेलची पत्नी

अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल ही पोषणतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आणि उद्योजिका आहे. मेहाचा जन्म गुजरातमध्ये झाला असून तिथेच ती लहानाची मोठी झाली. खाण्याच्या योग्य सवयी, तंदुरुस्तीविषयी जागरुकता, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली यांबाबत ती तिच्या कामातून लोकांना मदत करते. मेहा सहसा प्रकाशझोतात नसते. तिला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं. 2023 मध्ये अक्षरने मेहाशी लग्न केलं. त्यानंतर 2024 मध्ये तिने मुलाला जन्म दिला.

View this post on Instagram

A post shared by Axar Patel (@akshar.patel)

अक्षर पटेलची संपत्ती

अक्षर पटेलने क्रिकेट, ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून त्याने बरीच संपत्ती जमवली आहे. ‘एशियानेट न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, 2026 पर्यंत त्याची संपत्ती अंदाचे 60 ते 65 कोटी रुपयांदरम्यान आहे. त्याच्या कमाईचा मोठा भाग आयपीएलमधून येतो. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर 16.5 कोटी रुपयांची बोली लावली होती. ग्रेड-बी करार, कसोटी, वन-डे आणि टी-20 सामन्यांच्या स्वतंत्र शुल्कातून तो दरवर्षी अंदाजे तीन ते चार कोटी रुपये कमावतो. अक्षय अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही करतो. बोट, अपोलो आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्ससाठी त्याने जाहिराती केल्या आहेत. एका जाहिरातीसाठी तो जवळपास एक कोटी रुपये मानधन स्वीकारतो. याशिवाय त्याने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. अक्षरच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, लँड रोव्हर डिस्कव्हरी यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय