काव्या-अनिरुद्धच्या साधेपणाचे कौतुक, लग्नानंतर कर्मचाऱ्यांना भेटायले पोहोचले, शाही जेवणाचा थाट आयोजित, मॅन्यू ऐकाल तर…

Kavya Maran Anirudh Ravichander: सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि बॉलिवूड गायक अनिरुद्ध रविचंदर यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. आता तिने तिच्या कर्मचाऱ्यांसाठी शाही जेवणाचा थाट मांडला होता.

काव्या-अनिरुद्धच्या साधेपणाचे कौतुक, लग्नानंतर कर्मचाऱ्यांना भेटायले पोहोचले, शाही जेवणाचा थाट आयोजित, मॅन्यू ऐकाल तर...
| Updated on: Nov 26, 2026 | 12:51 PM

Kavya Maran Anirudh Ravichander Wedding: संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सन ग्रुपच्या कार्यकारी संचालक काव्या मारन सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. या जोडप्याने ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी पण भव्य समारंभात लग्न केले. यानंतर २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता, लग्नसमारंभातील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, नवविवाहित जोडपे सन ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी एका भव्य मेजवानीचे आयोजन करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, सन ग्रुपचे कर्मचारी केळीच्या पानांवर वाढलेल्या पारंपरिक दक्षिण भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या विशेष मेजवानीमध्ये विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. मुख्य पदार्थ म्हणून बिर्याणी होती, तर फ्राइड चिकन, मसालेदार ड्रमस्टिक करी, मटण सुक्का, उकडलेली अंडी, कांद्याचा रायता आणि वांग्याची भाजी यांचाही समावेश होता. जेवणानंतर पाहुण्यांना गुलाबजाम, आईस्क्रीम आणि इतर मिठाई देण्यात आली. ही मेजवानी पूर्णपणे पारंपरिक ठेवण्यात आली होती. समारंभादरम्यान, अनिरुद्ध आणि काव्या यांनी स्वतः कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले. त्यांच्या पेहरावाबद्दल बोलायचे झाल्यास, अनिरुद्ध ग्रे रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला, तर काव्या एका सुंदर लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसली.

Loading...

११ नोव्हेंबर रोजी या जोडप्याने ग्रीसमध्ये लग्न केले. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या रिसेप्शनला क्रिकेटपटू एम.एस. धोनी, अभिनेते अजित कुमार, नयनतारा, विजय देवराकोंडा, रश्मिका मंदाना, पूजा हेगडे, रम्या कृष्णन आणि शिवकार्तिकेयन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक अॅटली, लोकेश कनगराज, नेल्सन दिलीपकुमार आणि कार्तिक सुब्बाराज यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. उदयनिधी स्टॅलिन आणि अभिनेत्री सिमरन यांच्यासह इतर अनेक पाहुण्यांनीही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेता विजय आणि त्याची विभक्त पत्नी संगीता हे देखील रिसेप्शनला स्वतंत्रपणे आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us