AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: ‘रामायण’च्या टीमने घेतली अमित शाहांची भेट; आदिनाथ कोठारे मात्र गायब

Ramayana: ‘रामायण’ चित्रपटाच्या यशानंतर रणबीर कपूर, साई पल्लवी, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

Ramayana: 'रामायण'च्या टीमने घेतली अमित शाहांची भेट; आदिनाथ कोठारे मात्र गायब
'रामायण'च्या टीमने घेतली अमित शाहांची भेटImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 26, 2026 | 12:46 PM
Share

Ramayana: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटाला देशासह परदेशातही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच या चित्रपटाच्या टीमने दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा या भेटीदरम्यान उपस्थित होते. मात्र या भेटीदरम्यान चित्रपटातील इतर काही महत्त्वाचे कलाकार अनुपस्थित होते. यात लक्ष्मणाची भूमिका साकारलेला अभिनेता रवी दुबे आणि भरतच्या भूमिकेतील मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेही तिथे उपस्थित नव्हता.

अमित शाह यांनी केलं टीमचं कौतुक

‘रामायण’च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त केली. देशभरात आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘रामायण’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असल्याचंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाच्या महाकाव्याला इतक्या भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणण्याच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. विशेष म्हणजे, रामायणाचा इतिहास आणि त्याचं सांस्कृतिक महत्त्व याविषयी अमित शाह यांना असलेलं सखोल ज्ञान पाहून चित्रपटाच्या टीमलाही आश्चर्य वाटल्याचं वृत्त आहे.

पहा फोटो-

चित्रपटाच्या यशानंतर टीमची दिल्लीवारी

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची, साई पल्लवीने सीतेची, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे. रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहे, तर आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या भव्य निर्मितीची, व्हिज्युअल इफेक्ट्सची आणि कलाकारांच्या भूमिकांची चर्चा प्रदर्शनापासूनच सुरू आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली आहे. प्रदर्शनानंतरच्या 21 दिवसांत चित्रपटाचं जगभरातील एकूण कलेक्शन 1755 कोटी रुपयांच्या पुढे पोहोचलं आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

अमित शाह यांच्या भेटीपूर्वी रणबीर कपूर, नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांनी दिल्लीतील प्रसिद्ध गुरुद्वारा बंगला साहिब इथं जाऊन दर्शन घेतलं. चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी प्रार्थना करून आशीर्वाद घेतल्याचे फोटोही समोर आले होते. आता अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो चर्चेत आहेत. दरम्यान, ‘रामायण’चा पुढील भाग दिवाळी 2028 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादामुळे दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Follow Us
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?