Shweta Tiwari Lip Lock Scene: स्वतःपेक्षा 5 वर्ष लहान अभिनेत्यासोबत श्वेता तिवारीचा लिपलॉक सीन, लेकीची प्रतिक्रिया चर्चेत
Shweta Tiwari Lip Lock Scene: अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता श्वेताचा 5 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन दिल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावर अभिनेत्री लेक पलक तिवारी हिची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Shweta Tiwari-Akshay Oberoi Lip Lock Scene: अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेच्या माध्यमातून श्वेता घराघरात पोहोचली आणि चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला डोक्यावर घेतलं. त्यानंतर श्वेता हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर श्वेता हिने अभिनय विश्वावर राज्य केलं. पण अनेकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी श्वेता हिने एका वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती, त्या सीरिजचं नाव होतं, ‘हम तुम एंड देम’, सीरिजमध्ये श्वेता तिवारी बॉलिवूड अभिनेता अक्षय ओबेरॉय याच्यासोबत दिसली.
सीरिजमध्ये श्वेता आणि अक्षय यांच्यावर एक लिपलॉक सीन शूट करण्यात आलेला. श्वेताने दिलेला लिपलॉक सीन पाहून चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला. श्वेता आणि अक्षय यांच्या लिपलॉक सीनवर अभिनेत्रीची लेक पलक तिवारी हिने देखील प्रतिक्रिया दिलेली. तेव्हा पलक हिने दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेत आलेली.
‘हम तुम अँड देम’ सीरिजमध्ये श्वेताची भूमिका
या सीरिजमध्ये श्वेता तिवारीने अक्षय ओबेरॉयसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘हम तुम अँड देम’ सीरिजमध्ये एक असा सीन होता, जिथे दोघांना लिपलॉक करताना पाहिलं गेलं होतं. श्वेता तिवारी आणि अक्षय ओबेरॉय यांच्या वयात जवळपास 5 वर्षांचा फरक आहे. दोघांमध्ये 5 वर्षांचा फरक असल्यामुळे चित्रित करण्यात आलेला सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला.
लेक पलक हिची प्रतिक्रिया
श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीदेखील एक अभिनेत्री आहे. ही सीरिज पाहिल्यानंतर श्वेताची मुलगी पलकला आईचं काम खूप आवडले होते. पलकने तिच्या आईचं भरभरून कौतुक केलं होतं. सांगायचं झालं तर, जेव्हा या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा त्यात मेकर्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लिपलॉक सीन ठेवला होता. श्वेताला ही गोष्ट आवडली नव्हती आणि तिने क्रिएटिव्ह टीमवर नाराजी व्यक्त केलेली. श्वेता तिवारीचे हे बोल्ड सीन्स इंटरनेटवर चर्चेत होते. अनेक जणांनी या अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं, तर काहींनी तिला ट्रोलदेखील केलं होतं.
