AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दोन राष्ट्रीय पक्षाचा सफाया होणार, ओपिनियन पोलचा धक्कादायक सर्व्हे

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठीच्या ओपिनियन पोलनुसार भाजप आणि समाजवादी पक्षात काँटे की टक्कर अपेक्षित आहे. 'स्कोर इंटेलिजेन्स'च्या सर्व्हेत दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेच्या 50-50 टक्के शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि बसपासारख्या राष्ट्रीय पक्षांचा सपशेल सफाया होण्याचा अंदाज आहे.

UP Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दोन राष्ट्रीय पक्षाचा सफाया होणार, ओपिनियन पोलचा धक्कादायक सर्व्हे
UP Assembly Election 2027Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 12:15 PM
Share

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी म्हणजे 2027 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. देशातील सर्वात मोठ्या राज्यातील या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. योगी आदित्यनाथ तिसऱ्यांदा सत्तेत येणार की अखिलेश यादव यांना जनता संधी देणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्कोर इंटेलिजेन्स’ (SCORE Intelligence) एजन्सीने एक धक्कादायक ओपिनियन पोल जारी केला आहे. स्कोर इंटेलिजेन्सच्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीत चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही पक्षाला सत्तेत येण्याचे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत. तर, दुसरीकडे या निवडणुकीत दोन राष्ट्रीय पक्षांचा सफाया होणार असल्याचंही या सर्व्हेत म्हटलं आहे.

‘स्कोर इंटेलिजन्स’ (SCORE Intelligence) एजन्सीच्या सर्व्हेनुसार, भाजपला 177 ते 215 जागा आणि समाजवादी पार्टीला 160 ते 202 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपची इतर पक्षांसोबत आघाडी झाली तर भाजपच्या जागा वाढणार आहेत. पण दुसरीकडे समाजवादी पार्टी काँग्रेससोबत मिळून लढल्यास समाजवादी पार्टीची सत्ता येण्याची शक्यता या पोलमधून वर्तवण्यात आली आहे. या पोलची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस स्वबळावर लढल्यास काँग्रेसला केवळ दोन जागा मिळणार आहे. तर मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला फक्त एक जागा मिळणार आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षाचा पूर्णत: सफाया होणार आहे.

42 जागांवर चुरशीची लढत

या सर्व्हेत कोणत्या पक्षाला किती व्होट मिळतील याची माहितीही देण्यता आली आहे. समाजवादी पार्टीला (36.98%) आणि भाजपला (36.69%) मते मिळणार आहेत. म्हणजे दोन्ही पक्षातील मतांचं अंतर केवळ 0.29 टक्के एवढंच असणार आहे. समाजवादी पार्टीला किंचित वोट मिळणार असले तरी सीट मात्र भाजपच्या खात्यात अधिक येण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम यूपीसह इतर भागात भाजपला मजबूत व्होट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या ओपिनियन पोलनुसार सुमारे 42 विधानसभेच्या जागांवर भाजप आणि समाजवादी पार्टीत चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी दोघांमधील जय पराजयाचं अंतर अत्यंत कमी असणार आहे.

योगीच पहिली पसंत

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंत कुणाला? या पोलनुसार मतदारांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंत दर्शवली आहे. आदित्यानाथ यांना 35.29% मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर अखिलेश यादव यांना 26.50% मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. चंद्रशेखर आजाद यांना 1.90%, प्रियंका गांधी यांना 1.25%, राजनाथ सिंह यांना 1%, राहुल गांधी यांना 0.27% आणि केशव प्रसाद मौर्य यांना 0.14% लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवली आहे. तर, 22.66% मतदारांनी आपली भूमिका मांडलेली नाहीये.

कुणाला किती जागा आणि मते?

भाजपा 177 – 215 जागा, 36.69% मते

समाजवादी पार्टी 160 – 202 जागा, 36.98% मते

राष्ट्रीय लोक दल 10 जागा, 1.15% मते

अपना दल (सोनेलाल) 5 जागा, 1.23% मते

सुभासपा 3 – 5 जागा, 0.80% मते

निषाद पार्टी 1 – 3 जागा, 0.51% मते

काँग्रेस 2 जागा, 7.67% मते

जनसत्ता दल लोकतांत्रिक 2 जागा, 0.12% मते

बहुजन समाज पार्टी 1 जागा, 11.45% मते

Follow Us
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?