AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Reserve: खरेदी नाही तरी भारतात कसे आले 60 टन सोने? किंमती घसरणार?

Gold Reserve of India: भारतात गेल्या महिन्याभरात सोन्याच्या किंमतीत मोठी दणआपट सुरू आहे. त्याचवेळी एक मोठी अपडेट समोर येत आहे. देशात 60 टन सोने आले आहे. त्यामुळे किंमतीवर परिणाम होईल का?

Gold Reserve: खरेदी नाही तरी भारतात कसे आले 60 टन सोने? किंमती घसरणार?
खरेदी नाही तरी भारतात कसे आले 60 टन सोने? किंमतीवर मोठा परिणाम होणार?
| Updated on: Nov 26, 2026 | 12:21 PM
Share

Gold Reserve of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याच्या साठ्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय बँकेने एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान 60.08 टन सोने परदेशातून भारतात परत आणले आहे. यामुळे देशातील सोन्याचा साठा आता 740.13 टन (India gold reserves) झाला आहे. हाच साठा मार्च महिन्यात 680.05 टन इतका होता. RBI ने परदेशी चलन नियमनाच्या व्यवस्थापनाविषयी सहा महिन्यांचा एक अहवाल सादर केला. त्यानुसार, सप्टेंबर 2026 पर्यंत केंद्रीय बँकेकडे एकूण 880.52 टन सोने होते. यामधील जवळपास 84.06% सोने भारतात आहे. मार्च 2026 मध्ये हा वाटा 77.23% इतका होता.

RBI ने का परत आणले सोने?

जागतिक अनिश्चितता आणि वाढता भूराजकीय तणावादरम्यान RBI सातत्याने सोने देशात परत आणत आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या सहामाहीत 104 टन सोने भारतात परत आणण्यात आले होते. या अहवालानुसार, सप्टेंबर 2026 पर्यंत 140.39 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे (BIS) सुरक्षित ठेवण्यात आले होते.

परकीय गंगाजळीत सोन्याचा वाटा कमी

सोन्याची आवक वाढली आहे. सोन्याचा साठा वाढला आहे. तरीही परकीय गंगाजळीत सोन्याचा वाटा कमी झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्य आधारावर सप्टेंबर 2026 च्या अखेरीस परदेशी चलन साठ्यात सोन्याचा टक्का 14.38% इतकाच उरला. तर मार्च 2026 मध्ये हा साठा 16.70% इतका होता.

जागतिक बाजारात सोने 9% घसरले

एप्रिल ते सप्टेंबर 2026 या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आला. या कालावधीत सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. सप्टेंबर महिन्यात सोन्याचा सरासरी भाव जवळपास 9% घसरून 4,319 डॉलर प्रति ट्रॉय औंस इतका होता. तर एप्रिल महिन्यात हा भाव जवळपास 4,721 डॉलर प्रति ट्रॉय औंस राहिला.

अमेरिकन ट्रेझरी बाँड्सवरील अधिकचे उत्पन्न, डॉलरची मजबूत स्थिती, व्याजदरात वाढ या कारणांमुले सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचे समोर येत आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि पोर्टफोलिओमधील विविधता आणण्यासाठी सोन्याची मागणी कायम आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींवर दबाव कायम आहे.

Follow Us
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?