AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या लग्नात घडला असा प्रसंग, अमृता खानविलकरने सुरू केला शोध; आज थेट फोर्ब्स इंडियाकडून दखल

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर केवळ अभिनयामुळेच नाही, तर उद्योजिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. तिच्या ‘अमुल्य बाय अमृता’ या साडी ब्रँडची फोर्ब्स इंडियाने दखल घेतली आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 12:19 PM
Share
मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आता उद्योजिका म्हणून चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच व्यवसायाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अमृताच्या 'अमुल्य बाय अमृता' या ब्रँडची प्रतिष्ठित फोर्ब्स इंडियाने दखल घेतली आहे. भारतातील लक्झरी ब्रँड्समधील फाऊंडर्सच्या यादीत अमृताचा समावेश करण्यात आला आहे.

1 / 6
अमृतासाठी ‘अमुल्य बाय अमृता’ हा केवळ व्यावसायिक उपक्रम नसून तिच्या वैयक्तिक अनुभवातून जन्माला आलेली संकल्पना आहे. या ब्रँडची सुरुवात करण्यापूर्वी जवळपास बारा वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग तिच्यासाठी प्रेरणादायी ठरला. बहिणीच्या लग्नादरम्यान अमृताला जाणवलं की, तिच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेकडे अस्सल हातमागावर विणलेली पैठणी नव्हती. त्यानंतर तिने अस्सल पैठण्यांचा शोध सुरू केला.

2 / 6
या शोधातून तिला विणकरांचं जग, पारंपरिक कारागिरी आणि प्रत्येक साडीमागे दडलेल्या कथा जवळून समजल्या. एका वैयक्तिक अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास पुढे व्यवसायाच्या कल्पनेत बदलला. महिलांना अस्सल आणि सुंदर साड्यांचा अनुभव देता यावा, या उद्देशाने तिने 2026 मध्ये ‘अमुल्य बाय अमृता’ या ब्रँडची सुरुवात केली.

3 / 6
‘अमुल्य बाय अमृता’च्या माध्यमातून अमृताला पारंपरिक हातमाग आणि विणकरांची कला अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवायची आहे. यासाठी ती विणकरांसोबत जवळून काम करते. त्यांच्या कलेची वैशिष्ट्यं समजून घेत खास आणि तरीही परवडणाऱ्या कलेक्शनवर भर दिला जात आहे. प्रत्येक साडीमागची मेहनत, परंपरा आणि कलात्मकता ग्राहकांपर्यंत पोहोचावी, हा या ब्रँडमागचा मुख्य विचार आहे.

4 / 6
अमृताच्या या ब्रँडची चर्चा आता मनोरंजनविश्वातही होऊ लागली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमासाठी ‘अमुल्य बाय अमृता’चा मराठमोळा साज परिधान केला होता. त्यामुळे या ब्रँडकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. इतकंच नाही, तर आगामी बहुचर्चित ‘ईठा’ चित्रपटासाठीही ‘अमुल्य बाय अमृता’ हा अधिकृत साडी ब्रँड म्हणून जोडला गेला आहे. यामुळे अमृताच्या व्यवसायाला मनोरंजनविश्वातूनही मोठं व्यासपीठ मिळत आहे.

5 / 6
अभिनय, नृत्य आणि आता उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये अमृता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. फोर्ब्स इंडियाकडून झालेली दखल तिच्या या व्यावसायिक प्रवासासाठी महत्त्वाची मानली जात आहे. एका वैयक्तिक भावनेतून सुरू झालेला ब्रँड आता लक्झरी फॅशन विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

6 / 6
Follow Us
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?