AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kokan: नारळाच्या बागा, लाल मातीची घरं अन् निसर्ग; कोकणातील अशी गावं जिथे वेळ थांबल्यासारखा वाटतो

Kokan: कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते निळाशार समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि लाल मातीची घरं. मात्र, कोकणात अशी काही सुंदर गावं आहेत जिथे शहराचा गोंगाट नाही, पर्यटकांची गर्दी नाही; आहे तो फक्त निसर्गाचा सहवास आणि शांतता.

| Updated on: Nov 26, 2026 | 9:23 AM
Share
रायगड जिल्ह्यातील बागमंडला हे खाडीकिनारी वसलेलं सुंदर गाव आहे. इथला निसर्ग, खाडीचं शांत पाणी आणि फेरीबोटीचा प्रवास पर्यटकांना वेगळाच अनुभव देतो. बागमंडला इथून सावित्री नदी ओलांडून बाणकोटच्या दिशेने फेरीबोटीने जाता येतं. या प्रवासात खाडीचं सौंदर्य अनुभवता येतं. जवळच हरिहरेश्वर आणि बाणकोट किल्ला अशी पर्यटनस्थळंही आहेत. शहराच्या धावपळीपासून दूर काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकतं.

1 / 6
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात कासव महोत्वसाच्या निमित्ताने पर्यटक इथं येतात. समुद्रकिनारा, पारंपरिक कोकणी घरं आणि गावातील साधेपणा यामुळे वेळासची सफर संस्मरणीय ठरते.

2 / 6
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेलं मिठबाव हे निसर्गरम्य गाव आहे. इथला समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा आणि गावाकडचं साधं जीवन पर्यटकांना आकर्षित करतं. समुद्रकिनाऱ्यावर निवांत फेरफटका मारणं, सूर्यास्त पाहणं आणि स्थानिक घरांमध्ये मिळणारं मालवणी जेवण अनुभवणं ही इथल्या भेटीची खासियत आहे. जवळच गजबादेवी मंदिरही आहे.

3 / 6
देवगड तालुक्यातील तांबळडेग हे समुद्रकिनाऱ्याच्या शांततेचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. मिठबावच्या जवळ असलेल्या या किनाऱ्यावर तुलनेनं कमी पर्यटक दिसतात. किनाऱ्यालगतची झाडं, वाळूचा विस्तीर्ण पट्टा, मासेमारीच्या होड्या आणि अथांग समुद्र यामुळे इथलं वातावरण मनाला प्रसन्न करतं. समुद्रकिनाऱ्यावर निवांत चालणं, फोटोग्राफी करणं आणि सूर्यास्ताचा आनंद घेणं यासाठी हे ठिकाण खास आहे. जवळच देवगड किल्ला आणि कुणकेश्वर मंदिरालाही भेट देता येतं.

4 / 6
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेलं तुरळ हे कोकणच्या अस्सल ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारं गाव आहे. इथली पारंपरिक घरं, गणेशोत्सवाचा उत्साह, गावातील माणसांमधील जिव्हाळा आणि जुन्या परंपरा ही या गावाची वैशिष्ट्यं आहेत. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात गावातील धार्मिक परंपरा आणि उत्सवाचं वातावरण अनुभवण्यासारखं असतं.

5 / 6
कोकणातील या गावांना भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम मानला जातो. या काळात हवामान तुलनेनं आल्हाददायक असतं आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंदही घेता येतो. कोकणात गेल्यावर केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांनाच भेट न देता अशा छोट्या गावांमध्येही थोडा वेळ घालवा. कारण कोकणाचं खरं सौंदर्य केवळ समुद्रात नाही, तर इथल्या माणसांमध्ये, संस्कृतीत आणि निसर्गाच्या सान्निध्यातही दडलं आहे.

6 / 6
Follow Us
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात