AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: मोठी बातमी! SWP पद्धतीने काढण्यात येणारी PF रक्कम टॅक्स फ्री? मोठी अपडेट काय?

EPFO Update on PF SWP Tax Free: ईपीएफओ गेल्या दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना एकामागून एका आनंदवार्ता देत आहे. सेवेतही मोठा बदल झालेला आहे. त्यात आता पीएफ रक्कम काढण्यासाठी SWP ला मंजूरी दिल्यानंतर अजून एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

EPFO: मोठी बातमी! SWP पद्धतीने काढण्यात येणारी PF रक्कम टॅक्स फ्री? मोठी अपडेट काय?
SWP पद्धतीने काढण्यात येणारी PF रक्कम टॅक्स फ्री?
| Updated on: Nov 26, 2026 | 11:46 AM
Share

EPFO Update on PF SWP Tax Free: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने पीएफ रक्कम काढण्यासाठी SWP ला मंजूरी दिली आहे. म्हणजे सदस्यांना पीएफ रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार आहे. तर सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन(SWP) द्वारे काढण्यात येणारी रक्कम करमुक्त करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आयकर अधिनियम, 2025 मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी वित्त मंत्रालयाकडे केल्याची माहिती समोर येत आहे.

SWP पद्धतीने काढण्यात येणारी रक्कम करमुक्त?

याविषयीच्या अहवालानुसार, श्रम मंत्रालयाने ईपीएफ अंशदानावरील व्याजावर कर सवलतीचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी वित्त मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाशी याविषयीची प्राथमिक चर्चा झाली आहे. आयकर अधिनियम 2025 मध्ये आवश्यक सुधारणा करण्याविषयी आता हा मुद्दा पुढे रेटण्यात येणार आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतरही ईपीएफमध्ये योगदान देण्याची परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे व्याजावरील करनियम स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

SWP योजनेची वैशिष्ट्ये काय?

19 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या सीबीटीच्या 240 व्या बैठकीत निवृत्तीनंतरच्या सदस्यांसाठी SWP पर्यायाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता. या सुविधेनुसार, सदस्य उर्वरित निधीवर व्याज मिळवत असतानाच मासिक, त्रैमासिक अथवा सहामाही तत्वावर ठराविक रक्कम काढू शकतात. साधारणपणे ईपीएफ खाते पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असल्यास एकरक्कमी पैसे काढल्यावर त्यावर कर लागत नाही. त्याच धरतीवर SWP अंतर्गत काढण्यात येणारी रक्कमही करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता कर्मचाऱ्यांना निर्णयाची प्रतिक्षा

SWP सुविधेमुळे निवृत्तीनंतर सदस्यांना नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न मिळेल. तर खात्यातील शिल्लक रक्कमेवर व्याज मिळेल. त्यातच जर आत रक्कम काढताना ती करमुक्त झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. वित्त मंत्रालय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रस्तावावर काय निर्णय घेते? ही रक्कम करमुक्त होते का? याकडे देशातील 8 कोटींहून कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ही कर सवलत मिळाल्यास उतारवयात कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.

Follow Us
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल