AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन तेंडुलकर याचा मोठा खुलासा, मुंबई इंडियन्स सोडण्यावर माैन सोडले, थेट म्हणाला..

सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जुन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. अर्जुन याने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. यावर आता स्पष्टपणे बोलताना अर्जुन तेंडुलकर दिसला आहे.

अर्जुन तेंडुलकर याचा मोठा खुलासा, मुंबई इंडियन्स सोडण्यावर माैन सोडले, थेट म्हणाला..
Arjun Tendulkar IPL
| Updated on: Apr 02, 2026 | 8:31 AM
Share

भारताचा स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. मात्र, अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर माैन बाळगले गेले. अखेर मुंबई इंडियन्स सोडण्यावर थेटपणे भाष्य करताना अर्जुन तेंडुलकर दिसला. अर्जुन तेंडुलकर 2021 मध्ये मुंबई इंडियन्सच्या खेम्यात दाखल झाला. तो तब्बल 2025 पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, या इतक्या मोठ्या काळात त्याला फक्त 5 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्समध्ये त्याला फार काही संधी खेळण्याची मिळाली नाही. तो फक्त कायम संघाचा एक भाग होता. पण प्रत्यक्षात सामन्यांमध्ये त्याच्यावर जबाबदारी टाकली गेली नाही. पाच सामन्यात 3 विकेट घेण्यात त्याला यश मिळाले. स्विंग गोलंदाजीमध्ये क्षमता दाखवूनही, त्याला संघात स्थान शेवटपर्यंत मिळालेच नाही.

यावर आता स्पष्टपणे बोलताना अर्जुन तेंडुलकर दिसला आहे. नुकताच अर्जुन तेंडुलकर याला विचारण्यात आले की, त्याला जास्त संधी मैदानावर मिळाल्या नाहीत, त्यावर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणाला की, कोणालाही बेंचवर बसायला आवडत नाही. हा पण आपण मेहनत करत राहायला हवे, ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल, त्यावेळी संधीचे सोने करायला हवे.

आयपीएल 2026 च्या आधी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्सकडे 30 लाख रुपयांना ट्रेड करण्यात आले. त्याने अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग नाही. आता त्याला लखनऊ सुपर जायंट्सने खरेदी केले. यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर नक्की काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

सचिन तेंडुलकर याच्या मुलाने मुंबई इंडियन्स सोडल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, अनेक वर्ष संघात असूनही त्याला संधी मिळत नव्हती. जवळपास सर्वच सामन्यात तो बेंचवर बसलेला असायचा. अर्जुन तेंडुलकर कधी खेळणार आहे की नाही. असा प्रश्नही उपस्थित केला जात. शेवटी आता मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यावर अर्जुन तेंडुलकर व्यक्त झाल्याचे बघायला मिळतंय. अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये उतरला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा