Asia Cup 2022 : नसीम शाहच्या नावावर नवा रेकॉर्ड, माजी खेळाडूंनी केलं कौतुक

कालच्या चांगल्या कामगिरीमुळे नसीम खानच्या नावावर एक नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. सगळ्यात कमी वयात खेळण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

Asia Cup 2022 : नसीम शाहच्या नावावर नवा रेकॉर्ड, माजी खेळाडूंनी केलं कौतुक
पाकिस्तान टीमला मोठा धक्का
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 11:20 AM

आशिया चषक (Asia Cup 2022) सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर क्रिकेटची अधिक चर्चा पाहायला मिळत आहे. काल दुबईत शारजा मैदानातला सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिलं असं वाटतंय. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात नेमका विजय कोणाचा होणार याकडे संबंध देशाचं लक्ष लागलं होतं. त्याचवेळी नसीम शाहने (Naseem Shah)आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर आपल्या नावावर सुद्धा एक अनोखा रेकॉर्ड (Cricket Record) केला.

चाहत्यांच्या सोशल मीडियावर शुभेच्छा

नसीम शहाचं सध्याचं वय 19 आहे. या युवा खेळाडूने केलेल्या फलंदाजीमुळे पाकिस्तानातील सगळ्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कालच्या सामन्यात नसीमने 4 ओव्हर केल्या. चार ओव्हरमध्ये नसीम खानने 19 धावा दिल्या. त्याचबरोबर एक विकेट सुध्दा घेतली.

20 व्या षटकात सलग दोन षटकार खेचले

विशेष म्हणजे आठव्या क्रमांकावर आलेल्या नसीम खानने 20 व्या षटकात सलग दोन षटकार खेचले. त्यामुळे पाकिस्तान संघाला विजय मिळविता आला. त्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू शोएब अख्तर, वसिम अक्रम, शाहिद आफ्रिदी यांनी देखील सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

नसीम खानच्या नावावर एक नवा रेकॉर्ड

कालच्या चांगल्या कामगिरीमुळे नसीम खानच्या नावावर एक नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. सगळ्यात कमी वयात खेळण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. तसेच 10 व्या क्रमांकावर येऊन धावांचा पाठलाग करताना दोन षटकार मारल्याचा रेकॉर्ड नसीमच्या नावावर तयार झाला आहे.