AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 : क्रिकेट सामन्यानंतर पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मारहाण, शोएब अख्तरने व्हिडीओ केला शेअर

आत्तापर्यंत आफगाणिस्तानच्या चाहत्यांकडून अनेकदा असे कृत्य झाले आहे. हा एक खेळ आहे, तो खेळला पाहिजे, त्याचबरोबर योग्य पद्धतीने खेळला पाहिजे.

Asia Cup 2022 : क्रिकेट सामन्यानंतर पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मारहाण, शोएब अख्तरने व्हिडीओ केला शेअर
क्रिकेट सामन्यानंतर प्रेक्षक एकमेकांमध्ये भिडले, पाकिस्तानच्या प्रेक्षकांना बेदम मारहाण Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 10:33 AM
Share

काल अफगाणिस्तान (Afganistan) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात रोमांचक सामना झाला. नेमकं कोण जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचवेळी पाकिस्तानच्या नशीम शहा (Nazim Shah) या फलंदाजाने अंतिम षटकात सामना खेचून आणला. शेवटच्या षटकात सलग दोन षटकार लगावल्याने अफगाणिस्तानचा संघ पराभूत झाला. त्यानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानात रडल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काल झालेल्या सामन्यानंतर प्रेक्षक एकमेकांमध्ये भिडल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ शोएब अख्तरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून सामन्यावर पकड ठेवली

कालच्या सामन्यात दुबईच्या मैदानात प्रेक्षकवर्ग देखील अधिक होता. अफगाणिस्तानकडून कमी धावसंख्या उभारल्यानंतर पाकिस्तान संघ सहज पाठलाग करेल अशी स्थिती होती. परंतु अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून सामन्यावर पकड ठेवली. त्यामुळे सामना शेवटपर्यंत गेला.

पाकिस्तानचे टीशर्ट घातलेल्या प्रेक्षकांना मारहाण

सामना झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मैदानात तुफान मारहाण केली आहे. पाकिस्तानचे टीशर्ट घातलेल्या प्रेक्षकांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना शोएब अख्तरने खडेबोल सुनावले आहेत.

शोएब अख्तर भडकला

आत्तापर्यंत आफगाणिस्तानच्या चाहत्यांकडून अनेकदा असे कृत्य झाले आहे. हा एक खेळ आहे, तो खेळला पाहिजे, त्याचबरोबर योग्य पद्धतीने खेळला पाहिजे. तुम्हाला या खेळात पुढे जायचे असल्यास तर खेळाडू आणि प्रेक्षकांना अनेक गोष्टी शिकाव्या लागतील असं शोएब अख्तर याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.