AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहसीन नक्वीने रगडले नाक, बीसीसीआयकडे मागितली माफी, ट्रॉफीच्या वादावर सूर्यकुमार यादवकडे बोट दाखवत थेट म्हटले…

Asia Cup Trophy Mohsin Naqvi : आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक मेडल घेण्यास भारताने स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर ते चक्क भारताची ट्रॉफी आणि मेडल चोरून घेऊन पळाला. ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

मोहसीन नक्वीने रगडले नाक, बीसीसीआयकडे मागितली माफी, ट्रॉफीच्या वादावर सूर्यकुमार यादवकडे बोट दाखवत थेट म्हटले...
Asia Cup Trophy Mohsin Naqvi
| Updated on: Oct 01, 2025 | 1:46 PM
Share

भारताने आशिया कप 2025 जिंकला. मात्र, आशिया कप जिंकूनही भारताला त्याच्या हक्काची ट्रॉफी अजूनही मिळाली नाहीये. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये, अशी भूमिका अनेकांची होती. यादरम्यान भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळला. मात्र, काही गोष्टींचे खेळाडूंनी पालन केले. पाकिस्तानी खेळाडूंसोबत शेक हॅंट देखील केला नाही. पाकिस्तानसोबत अंतिम सामना आशिया कपमध्ये जिंकल्यानंतर भारताने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक मेडल घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. यादरम्यान बराच वेळ भारतीय खेळाडू हे मैदानावर होते. भारताला ट्रॉफी आणि खेळाडूंचे मेडल चोरून घेऊन मोहसीन नक्वी हे चक्क हॉटेलवर घेऊन गेले.

भारताने आशिया कप 2025 जिंकून काही तास झाले असतानाही अजूनही ट्रॉफी भारताला मिळाली नाही. भारतीय खेळाडूंना त्यांच्या हक्काची ट्रॉफी मोहसीन नक्वी चोरून घेऊन गेल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर बीसीसीआयने चांगलाच संताप व्यक्त केला. फक्त संतापच नाही तर थेट दुबई पोलिसांमध्ये ट्रॉफी चोरीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. यादरम्यानच आता आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली.

या बैठकीमध्ये ट्रॉफी चोरीवरून बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वी यांना ट्रॉफीच्या प्रकरणावरून चांगलेच धारेवर धरले. फक्त धारेवरच नाही तर मोठा राडा या बैठकीत झाला. इतर सर्व देश भारताच्या बाजूने उभा दिसले. बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेनंतर पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी अखेर बीसीसीआयकडे माफी मागितल्याचे खुलासा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

बैठकीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी म्हटले की, जे घडले ते चुकीचे आहे. आपण नव्याने सुरू करू. मी माफी मागतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने येऊन आशिया चषक घेऊन जावा. आता यावर बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण बीसीसीआयने स्पष्ट केले की, 72 तासांमध्ये मोहसिन नक्वी यांनी भारताची ट्रॉफी द्यावी, नाही तर आम्ही थेट दुबई पोलिस ठाण्यात ट्रॉफी चोरीचा गुन्हा दाखल करू.

मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.