AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रॉफी चोरी प्रकरणात मोहसिन नक्वीला 72 तासांचे अल्टीमेटम, थेट जेल..

भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केले आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. मात्र, सामना जिंकूनही भारताला अजूनही आपल्या हक्काची ट्रॉफी मिळाली नाहीये. मोहसिन नक्वी भारताची ट्रॉफी चोरून पळाले आहेत.

ट्रॉफी चोरी प्रकरणात मोहसिन नक्वीला 72 तासांचे अल्टीमेटम, थेट जेल..
Mohsin Naqvi
| Updated on: Oct 01, 2025 | 10:43 AM
Share

आशिया कप 2025 भारताने जिंकला. मात्र, भारताची हक्काची ट्रॉफी आणि मेडल घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पळाले. एखादा चोर ज्याप्रकारे चोरी करून वस्तू पळून नेतो तशी भारताची ट्रॉफी त्यांनी पळवली. या निर्लज्जपणामुळे बीसीसीआय चांगलीच संतापली आहे. आता हा सामना संपून काही तास उलटली आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताची ही ट्रॉफी अजूनही परत केली नाही. सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ काही वेळ मैदानात थांबला होता. त्यांनी ट्रॉफीशिवाय विजयाचा जल्लोष देखील केला. मात्र, शेवटपर्यंत भारतीय संघाला मेडल आणि ट्रॉफी देण्यात आली नाही. आता थेट दुबई पोलिसांमध्ये चोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

भारताची ट्रॉफी चोरून नेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या अंगलट येऊ शकते. 72 तास होऊनही त्यांनी ही ट्रॉफी भारताकडे दिली नाहीये. भारताकडेच नाही तर त्यांनी ही ट्रॉफी अजून आशियाई क्रिकेट परिषदेला देखील पाठवली नाही. एसीसी बैठकीत हा वाद उपस्थित करण्यात आला. यादरम्यान अनेक देशांनी मोहसिन नक्वी यांचा निषेध केला. अजूनही भारताची ही ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्याकडेच आहे.

बैठकीत मोहसिन नक्वी यांचा निषेध अनेक देशांनी केल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांनी भारताला ट्रॉफी दिली नाही. आता मोहसिन नक्वी यांच्यावर बीसीसीआय कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असून तसा निर्णय देखील घेण्यात आला. मोहसिन नक्वीविरुद्ध ट्रॉफी चोरी आणि जबरदस्तीने ताब्यात घेतल्याबद्दल दुबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोहसिन हे जेलमध्येही जाऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने मोहसिन नक्वी यांना ट्रॉफी एसीसी कार्यालयात परत करण्यासाठी तब्बल 72 तासांचा वेळ दिला आहे, तोपर्यंत भारताची ट्रॉफी ही मोहसिन नक्वी यांना एसीसी कार्यालयात आणून द्यायची आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर तात्काळ दुबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केला जाईल. जर हा गुन्हा दाखल झाला तर मोहसिन नक्वी यांना अटक देखील होऊ शकते. आता मोहसिन नक्वी काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.