आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी टीम इंडियाला कधी मिळणार? एसीसी बैठकीतून समोर आली अपडेट
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण भारताला जेतेपदाची ट्रॉफी काही मिळाली नाही. त्यामुळे आशिया क्रिकेट परिषदेने दुबईत एका बैठकीचं आयोजन केलं होतं. ही बैठक मोहसिन नकवीच्या अध्यतेखाली पार पडली.

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचं नाणं खणखणीत वाजलं. भारताने एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. विशेष पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं. यात अंतिम फेरीतही पराभवाची धूळ चारली. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण खरा वाद हा ट्रॉफी स्वीकारण्यावरून झाला. भारतीय संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. इतकंच काय इतर कोणाच्या हातून घेऊ असं देखील सांगितलं. पण मोहसिन नकवी हे काही ऐकलं नाही. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा मोहसिन नकवी पदकं आणि ट्रॉफी स्वत:सोबत घेऊन गेले. त्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी कधी मिळणार? यावरून चर्चा सुरु झाली. त्यामुळे मंगळवारी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक दुबईत आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीतही ट्रॉफीबाबत अंतिम काही ठरलं नाही.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत खरं तर ट्रॉफी व्यतिरिक्त उपाध्यक्षाची निवड आणि अंडर 19 स्पर्धेसाठी चर्चा होणार होती. पण ट्रॉफीचा मुद्दा इतका गाजला की इतर मुद्दे बाजूलाच राहिले. अखेर आशियाई क्रिकेट परिषदेने ही समस्या सोडवण्यासाठी पाच कसोटी खेळणाऱ्या देशांना म्हणजेच त्याच्या क्रिकेट बोर्डाच्या हाती निर्णय सोपवला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने बीसीसीआय, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, बांगलादेश क्रिकेट बोर्ड , श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांना ट्रॉफी वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी औपचारिक ऑफलाइन बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, एसीसीने आयोजित केल्या बैठकीत बीसीसीआयच्या वतीने राजीव शुक्ला आणि आशीष शेलार वर्च्युअल रुपाने उपस्थित होते.
दुसरीकडे, मोहसिन नकवी यांनी काही अटी ठेवल्याचा चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या भारताला आशिया कप ट्रॉफी हवी असेल तर त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला एसीसी कार्यालयात घेऊन यावं. तसेच त्यांच्याकडूनच स्वीकारवी अशी अट ठेवली आहे. पण भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआय अशा अटींना भीक घालणार नाही. भारतीय संघ विजयी झाला आहे आणि ट्रॉफीची गरज नाही. उलट असं काही असेल तर मोहसिन नकवींची जगभरात नाचक्की होईल.
