IND vs PAK : भारतीय संघाला मोठा धक्का, पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वीच वाईट बातमी, हा महत्वाचा खेळाडू…

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला रंगणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्साह हा बघायला मिळतोय.

IND vs PAK : भारतीय संघाला मोठा धक्का, पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वीच वाईट बातमी, हा महत्वाचा खेळाडू...
Asia Cup 2025
| Updated on: Sep 14, 2025 | 8:00 AM

आशिया कप 2025 ला सुरूवात झाली असून आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला आहे. मात्र, भारतातून भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्याला जोरदार विरोध होताना दिसतोय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघासोबत क्रिकेट खेळणे चुकीचे असल्याने अनेकांनी म्हटले. पाकिस्तानमधून आलेल्या दशतवाद्यांनीच पहलगाममध्ये हल्ला केला, ज्यामध्ये अनेक पर्यटक मारले गेले. आज हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे, भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या पुढे येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना म्हटले की, तो क्रिकेटच्या मैदानापेक्षा युद्धाचे मैदान बनते. या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.

पाकिस्तानसोबत सामना रंगण्याच्या अगोदरच भारताला मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय. शनिवारी सराव करताना शुभमन गिल याच्या हाताला दुखापत झाली. शुभमनकडे फिजिओ धावून जाताना दिसले. त्याच्यावर लगेचच उपचार देखील करण्यात आलीये. आता प्रश्न हा आहे की, शुभमन गिल याची जखमी किती मोठी आहे. मात्र, शुभमनकडे ज्याप्रकारे फिजिओ धावून जाताना दिसले यातून भारतासाठी वाईट संकेत असल्याचे दिसतंय.

रिपोर्टनुसार, सराव करत असताना शुभमन गिल याच्या हाताला बॉल लागला. त्यानंतर तो थेट वेदना होत असल्याने बाहेर आला. यानंतर फिजिओ हे त्याच्याकडे धावून गेले यादरम्यान त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले. काही वेळ फिजिओ हे शुभमन गिल याच्यासोबत चर्चा करताना देखील दिसले. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक हे शुभमन याच्यासोबत बोलताना दिसले.

शुभमन गिल याच्या हाताला लागल्यानंतर काही वेळ धावपळीची स्थिती बघायला मिळाली. आता प्रश्न हाच आहे की, शुभमन गिलची दुखापत अधिक गंभीर आहे का? कारण जर शुभमन गिलची दुखापत ही गंभीर असेल तर त्याला पाकिस्तान सामना मुकावा लागेल आणि हा भारतासाठी अत्यंत मोठा झटकाच असणार आहे. आज शुभमन गिल पाकिस्तानच्या सामन्यात मैदानात उतरणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.