माझ्या बायकोला तुझ्यासोबत झोपू देईन…Live मॅचमध्ये स्टार क्रिकेटरला मिळाली थेट ऑफर, असं काय घडलं की…Video Viral
SA vs AUS Test Video: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना पार पडला ज्यामधील एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

SA vs AUS Test Video: तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने केवळ मालिकाच जिंकली नाही, तर ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी क्रिकेटमधील वर्चस्वही हिसकावून घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ २-१ ने मालिकाच जिंकली नाही, तर कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक १ चा संघही बनला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी एक असा प्रसंग घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वायन मुल्डरसाठी असं काय केलं तो लाजला.
केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात वायन मुल्डरने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दुसऱ्या डावात ११५ धावा केल्या. मुल्डरच्या खेळीचे कौतुक करण्यासाठी चाहत्यांनी एक विचित्र गाणे गायले. मुल्डर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना, स्टँडमधील काही चाहत्यांनी त्याच्यासाठी गाणे गायला सुरुवात केली, ज्यामुळे त्या क्रिकेटपटूलाही हसू आवरता आले नाही. त्याची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
व्हिडिओमध्ये चाहते एक इंग्रजी गाणे गाताना दिसत आहेत, ज्याचे बोल असे आहेत, “ओह वियान मुल्डर, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ओह वियान मुल्डर, मी तुला माझ्या पत्नीसोबत झोपू देईन. ओह वियान मुल्डर, मला तुझ्यासारखे लाल केसांचे बाळ हवे आहे.” स्पष्टपणे, चाहते मुल्डरची मजा घेताना दिसले. मुल्डरलाही त्या गाण्यावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही. तो हसताना आणि मान हलवताना दिसला. यामुळे चाहते आणखी उत्साहित झाले, कारण क्रिकेटपटूची प्रतिक्रिया मिळवणे हाच त्या गाण्याचा उद्देश होता.
या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होती. केप टाऊनमधील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. ऑस्ट्रेलियाकडे १२४ रेटिंग गुण आहेत, तर न्यूझीलंडकडे १२२ आहेत. न्यूझीलंड १०६ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.