AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक असे गाव जिथे लग्नच होत नाही, तुम्ही चुकूनही जायचा विचार करु नका

भारतात एक गाव असे आहे जिथे मुला-मुलींची लग्नच होत नाहीये. आता हे गाव कोणते आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया हे गाव कोणते?

एक असे गाव जिथे लग्नच होत नाही, तुम्ही चुकूनही जायचा विचार करु नका
Indian VillageImage Credit source: freepik
| Updated on: Nov 01, 2026 | 1:30 PM
Share

भारतात एक गाव असे आहे जिथल्या समस्या ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या गावात राहणाऱ्या मुला आणि मुलींचे कधीच लग्न होत नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. आता हे भाव भारतात कुठे आहे? चला जाणून घेऊया…

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात हे गाव आहे. या गावातील गावकरी अशा समस्या घेऊन आले आहेत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या गावात राहणाऱ्या मुला आणि मुलींची लग्न कधीच होऊ शकत नाही. यामागचे कारण अंधश्रद्धा किंवा गरिबी नाही, तर एक छोटीशी सुविधा उपलब्ध नसणे हे आहे. या गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ताच नाही! होय, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण सत्य हेच आहे.

हे गाव विकासखंड इटियाथोकमधील ग्रामसभा शिवपुरियाचा मजरा अमारे भरिया आहे. गावाची लोकसंख्या सुमारे २००० आहे. पण इथले रहिवासी गेल्या जवळपास २३ वर्षांपासून एकाच समस्येशी झुंज देत आहेत. सन २००२ पर्यंत गावात पोहोचण्यासाठी एक कच्चा रस्ता (विटांचा पायवाटेसारखा रस्ता) होता. मात्र कालव्याचे खोदकाम झाल्यानंतर तो रस्ता बंद झाला.

गावकरी सांगतात की, इथपर्यंत पोहोचणे फार कठीण आहे. कोणताही पक्का रस्ता नाही, पूल किंवा रस्ताही नाही. पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयंकर होते. लोक शेत-गवताने आणि चिखलाने भरलेल्या वाटेने गावात ये-जा करतात. आजारी पडल्यास रुग्णाला बाहेरच्या रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण होते.

लग्नावरही संकट

गावाचे प्रतिनिधी सोमेश्वर नाथ पांडेय सांगतात, “जेव्हा कोणी लग्नासाठी स्थळ घेऊन येतो, तेव्हा पहिल्यांदा गावाचा रस्ता पाहूनच नकार देतो. लोक स्पष्टपणे म्हणतात की, जिथे ये-जा करण्याचा रस्ताच नाही, तिथे लग्न कसे करायचे?” यामुळे गावातील अनेक मुले-मुली लग्नाच्या वयाच्याही पुढे गेली आहेत, पण त्यांची लग्ने होऊ शकली नाहीत. ही समस्या फक्त नातेसंबंधांपुरती मर्यादित नाही. लग्नसमारंभासाठी बाहेरून लोक येऊच शकत नाहीत. कधी कधी लग्न ठरले तरी वरात इथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुटुंबांना नाते तोडावे लागते.

२००२ पासून कोणतीही दखल नाही

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही समस्या २००२ पासून चालू आहे. आतापर्यंत अनेकदा अधिकाऱ्यांकडे आणि नेत्यांकडे तक्रारी केल्या, पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही. सरकारकडून अनेक विकास योजना येतात, पण या गावापर्यंत त्या पोहोचत नाहीत.

Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?