धोनी टी20 वर्ल्डकप खेळणार का? 'दादा'चं अवाक करणारं उत्तर

धोनी टी20 विश्वचषक खेळणार का, असा प्रश्न सौरव गांगुलीला विचारण्यात आला, तेव्हा त्याने प्रश्नाचा चेंडू धोनीकडेच टोलवला.

धोनी टी20 वर्ल्डकप खेळणार का? 'दादा'चं अवाक करणारं उत्तर

मुंबई : ‘कॅप्टन कूल’ अशी बिरुदावली मिरवणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा दर महिन्याला सोशल मीडियावर ट्रेण्डिंगचा विषय ठरत असतात. अशातच धोनी टी20 वर्ल्डकप खेळणार का? हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीला याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने प्रश्नाचा चेंडू धोनीकडेच (Sourav Ganguly on MS Dhoni) टोलवला.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्यानंतर धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं होतं. धोनीचं वाढतं वय लक्षात घेता संघात तो पुनरागमन करण्याची शक्यता धूसर होत आहे. धोनीने आणखी काही काळ खेळावं, असं वाटणारा एक चाहतागट आहे, तर दुसऱ्या गटाला मात्र धोनीने रिटायरमेंट घ्यावी, असं वाटतं. पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला, तेव्हा ‘धोनीलाच का नाही विचारत’ असं उत्तर खुद्द गांगुलीने दिल्यामुळे सारेच अवाक झाले.

धोनीमुळे 2011 च्या विश्वचषकात माझं शतक हुकलं, गौतमचा ‘गंभीर’ दावा

एकदिवसीय विश्वचषकानंतर धोनीने दोन महिन्याची विश्रांती घेतली होती. भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर असतानाही धोनीने दौऱ्यातून माघार घेतली होती. त्या काळात धोनी भारतीय सैन्याच्या 106 TA बटालियन (पॅरा) सोबत काश्मीर खोऱ्यात सेवा दिली. दोन महिन्यांनंतर धोनी मैदानावर परतणार, असं वाटत असतानाच धोनीने आणखी काही काळ विश्रांती घेत असल्याचं सांगितलं.

आता, सौरव गांगुलीने ‘तुम्ही धोनीलाच विचारा’ असं सूचक वक्तव्य करत अधिक बोलणं टाळलं. त्यामुळे ‘क्या होगा धोनी का?’ हा प्रश्न चाहत्यांना (Sourav Ganguly on MS Dhoni) सतावत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *