बीसीसीआय हार्दिक पंड्याला गर्लफ्रेंडला मिठी मारण्यापासून, Kiss करण्यापासून रोखणार!
IPL 2026 दरम्यान अनेक भारतीय क्रिकेटर त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसत आहेत. सामन्या दरम्यान, खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत राहत असल्याने बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे... तर यावर लवकरच नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

IPL 2026 दरम्यान अनेक विदेशी खेळाडूंसोबतच अनेक भारतीय खेळाडू देखील त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसत आहेत. गेल्या वर्षी बीसीसीआयने परदेशी दौऱ्यांवर काही सक्त नियम केलेले. बोर्डाने खेळाडूंच्या पत्नी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या कुटुंबियांबाबत नियम निश्चित केले आहेत. आयपीएल सामन्यांदरम्यान खेळाडूंना त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत राहण्यापासून रोखण्यासाठी अशीच कारवाई केली जाऊ शकते. सांगायचं झालं तर, खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत एकाच हॉटेलमध्ये राहत आहेत.. अशात आयपीएल दरम्यान कोणते वाद होऊ नये म्हणून बीसीसीआय मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआय करणार मोठी कारवाई…
मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएल मध्ये गर्लफ्रेंड कल्चविरोधात बीसीसीआय कठोर निर्णय घेणार आहे… गर्लफ्रेंड कल्चरबाबत अधिक कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. कोणतीही मोठी चूक होण्यापूर्वीच बीसीसीआयला सतर्क राहायचं आहे. काही खेळाडू तर हॉटेलमध्ये त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत राहत आहेत. बीसीसीआय या समस्येवर चर्चा करणार आहे… अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
🚨 THE BCCI TO TAKE STRICT ACTIONS AGAINST GIRLFRIEND CULTURE GOING IN THE IPL. 🚨
1️⃣ BCCI preparing to enforce strict rule on Girlfriend culture. 👫
2️⃣ BCCI wants to be careful before any major blunder happens. ‼️
3️⃣ Some of the players are even staying at the team’s hotel…
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 4, 2026
पत्नी आणि कुटुंब नाही गर्लफ्रेंड आहे अडचण…
बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, कुटुंबातील सदस्य आणि पत्नी यांची काहीही अडचण नाही. पण गर्लफ्रेंड कल्चरवर बीसीसीआय मोठी कारवाई करण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2027 पासून गर्लफ्रेंड कल्चरबाबत नवीन नियम लागू होऊ शकतात. बीसीसीआयचा असा विश्वास आहे की, जर अधिक कठोर नियम लागू केले नाहीत, तर भविष्यात मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
सामन्यादरम्यान, अनेक अनोळखी खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत प्रवास करत आहेत, तर काही जण त्यांचे सामने पाहण्यासाठी शहरात आले आहेत. या खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्समध्ये अशा अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांनी यापूर्वी बेटिंग वेबसाइट्सचा प्रचार केला आहे. असं अनेकदा झालं आहे, जेव्हा आयपीएल खेळाडूंविरुद्ध त्यांच्या गर्लफ्रेंडनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.
सांगायचं झालं तर, सध्या सुरु असलेल्या लीग दरम्यान, हार्दिक पांड्या याला अनेकदा गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. तर अर्शदीप सिंह याला देखील गर्लफ्रेंड समरीन कौर हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, ईशान किशन देखील गर्लफ्रेंड अदिती हुंडिया हिच्यासोबत प्रवास करताना दिसतो.