Rishabh Pant : हरल्यानंतर टीव्हीवर बोलताना ऋषभने खूप घाण नको ते शब्द वापरले, एकाचदिवशी त्याला दोन वाईट बातम्या मिळाल्या VIDEO

Rishabh Pant : ऋषभ पंतसाठी कालचा दिवस खूप वाईट ठरला. एक म्हणजे तो नेतृत्व करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स टीमचा राजस्थान रॉयल्सने पराभव केला. चांगली धावसंख्या उभारुनही लखनऊची हार झाली. त्याआधी ऋषभ पंतला दोन वाईट बातम्या मिळाल्या.

Rishabh Pant : हरल्यानंतर टीव्हीवर बोलताना ऋषभने खूप घाण नको ते शब्द वापरले, एकाचदिवशी त्याला दोन वाईट बातम्या मिळाल्या  VIDEO
Rishabh Pant
| Updated on: May 20, 2026 | 8:47 AM

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे ग्रह सध्या फिरले आहेत. त्याचे वाईट दिवस सुरु आहेत. आयपीएलमध्ये त्याची टीम लखनऊ सुपर जायंट्सच खराब प्रदर्शन सुरु आहे. कर्णधार म्हणून त्याला छाप उमटवता आलेली नाही. भारताच्या वनडे टीममधून त्याला बाहेर करण्यात आलय. टेस्ट टीममध्ये त्याला उपकर्णधार पदावरुन हटवण्यात आलं आहे. एवढ सगळं मनस्ताप देणारं ऋषभच्या आयुष्यात घडत आहे. यात भर म्हणून आता आयपीएलमध्ये एक मुलाखत देताना त्याने शिवी घातली. इयान बिशपशी बोलत असताना ऋषभ पंताचा जिभेवरील ताबा सुटला. ऋषभ पंत पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त करत होता. शेवटी त्याने एक शिवी घातली. पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. युजर्स त्याला भरपूर सुनावताना दिसतायत.

लखनऊच्या पराभवानंतर ऋषभ पंत कॅमेऱ्यासमोर इयन बिशप यांच्याशी चर्चा करण्यासाठी आला. “मिडल ओव्हर्स आणि लास्ट ओव्हरमध्ये आर्चरने सुंदर गोलंदाजी केली. आम्ही अजून 10 रन्स बनवू शकलो असतो, पण असं झालं नाही. जयपूरची विकेट बॅटिंगसाठी चांगली होती. गोलंदाजी इथे कठीण होती. इथे अनुभवाची गरज होती. ती कमतरता जाणवली. अनुभव असेल, तर कठीण प्रसंगात तुम्ही चांगलं प्रदर्शन करु शकता. मला माझ्या टीमवर अभिमान आहे. पण हे सुद्धा सत्य आहे की XXX (शिवी) चांगली टीम आहे” असं पंत म्हणाला. या कृतीसाठी ऋषभ पंतवर दंड ठोठावला जाऊ शकतो. बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करु शकते.

वैभव सूर्यवंशीचा हल्लाबोल

लखनऊच्या गोलंदाजांवर राजस्थानचा ओपनर वैभव सूर्यवंशीने हल्लाबोल केला. त्याने तुफान बॅटिंग केली. या डावखुऱ्या फलंदाजाने 38 चेंडूत 93 धावा फटकावल्या. यात 10 सिक्स आणि 7 बाऊंड्री होत्या. ध्रुव जुरेलने नाबाद 53 धावा केल्या. कॅप्टन यशस्वी जैस्वालने 23 चेंडूत 43 धावा केल्या. लखनऊच्या मिचेल मार्शने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. त्याने 57 चेंडूत 96 धावा तडकवल्या. इंग्लिसने 29 चेंडूत 60 रन्स आणि ऋषभ पंतने 35 धावा केल्या. लखनऊने विजयासाठी दिलेलं 221 धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सने 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पार केलं.

 

 

Follow Us