CWG 2022: महाराष्ट्राच्या संकेतने कॉमनवेल्थ मध्ये देशाला मिळवून दिलं पहिलं मेडल

| Updated on: Jul 30, 2022 | 5:52 PM

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. संकेत महादेव सरगरने वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनीगटात पदक विजेती कामगिरी केली आहे.

CWG 2022: महाराष्ट्राच्या संकेतने कॉमनवेल्थ मध्ये देशाला मिळवून दिलं पहिलं मेडल
Follow us on

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. संकेत महादेव सरगरने वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनीगटात पदक विजेती कामगिरी केली आहे. 19 वर्षाच्या संकेतने बर्मिंघम रौप्यपदक विजेती कामगिरी केली आहे. संकेत महाराष्ट्राच्या सांगलीचा आहे. संकेतने इथवर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. संकेतने वजन उचलण्याआधी त्याचा स्वत:चा शत्रू बनलेल्या वजनावर मात केली. त्यानंतर हे यश मिळवलं. आज बर्मिंघम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत त्याने एकूण 248 किलो वजन उचललं.

कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी

संकेत महादेव सरगर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मागच्या महिन्यात तो नॅशनल आणि खेलो इंडियन यूथ गेम्स मध्ये भाग घेण्यासाठी भुवनेश्वरला गेला होता. त्यावेळी वजन जास्त असल्यामुळे त्याच स्पर्धेत सहभागी होणं कठीण दिसत होतं. 55 किलो गटात उतरणाऱ्या संकेतच वजन 1.7 किलोने जास्ती होतं.

भात खाणं बंद केलं

मी भुवनेश्वर मध्ये पोहोचलो, तेव्हा माझं वजन 56.7 किलोग्रॅम होतं. त्यानंतर मी तात्काळ कार्बोहायड्रेट सारखे पदार्थ भात बंद केला. उकडलेल्या भाज्या आणि सॅलेड सुरु केलं. मी पाणी पिण सुद्धा कमी केलं. हे सर्व नियम डाएट पाळलं, आज त्यामुळेच त्याला देशाचा गौरव वाढवता आला.

12 तास मेहनत केली

कॉमनवेल्थ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या संकेतने वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस वयाच्या 13 व्या वर्षी सुरु केली होती. त्यावेळी कदाचित दुसरी मुलं या खेळाकडे वळली होती. संकेत 12-12 तास सराव करायचा. आज पदक मिळवलं, त्याच मेहनतीचा हा परिणाम आहे.