Video : कोलकाताकडून हैदराबादला 178 धावांचं टार्गेट, आंद्रे रसेलचा नवा विक्रम, पाहा Highlights Video

| Updated on: May 14, 2022 | 10:31 PM

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय.

Video : कोलकाताकडून हैदराबादला 178 धावांचं टार्गेट, आंद्रे रसेलचा नवा विक्रम, पाहा Highlights Video
कोलकाताकडून हैदराबादला 178 धावांचं टार्गेट
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (SRH) सामना सुरु आहे. 61 वा सामना आज खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा केल्या. तो 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. मलिकने एकाच षटकात या दोघांनाही परत पाठवले. पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. त्यानंतर टी नटराजनने केकेआरच्या रिंकू सिंगला एलबीडब्ल्यू केलं. पंचाने त्यानंतर त्याला बाद केलं. पण तरिही रिंकू हा खेळपट्टीवर उभा राहिल. यानंतर गोंधळ उडाला होता. दरम्यान, हैदराबादला 178 धावांचं टार्गेट कोलकाताने दिलंय. आता या लक्ष्याला हैदराबाद पूर्ण करणार का, ते पहावं लागेल.

उमरान मलिकनं घेतलेल्या विकेट्स, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

व्यंकटेश अय्यर बाद

व्यंकटेश अय्यर दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को यानसेनने त्याला त्रिफळाचीत केले. व्यंकटेशने बाद होण्यापूर्वी सहा चेंडूंत सात धावा केल्या.

नितीश राणा बाद

नितीश राणा चांगली फलंदाजी करूनही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर तो उमरान मलिकने शशांक सिंगच्या हाती झेलबाद झाला. राणाने बाद होण्यापूर्वी 16 चेंडूत 26 धावा केल्या.

अजिंक्य रहाणे बाद

उमरान मलिकने आपल्या पहिल्याच षटकात कोलकात्याच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून शानदार सुरुवात केली आहे. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमरानने अजिंक्य रहाणेला शशांककडून झेलबाद केले. उमरानच्या झेललेल्या चेंडूवर रहाणेने स्वीपर कव्हरच्या दिशेने हवेत शॉट खेळला पण शशांकने सीमारेषेजवळ धावताना सर्वोत्तम झेल टिपला.

अजिंक्य रहाणेची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कर्णधार श्रेयस बाद

उमरान मलिकने केकेआरला बॅकफूटवर ढकलले. त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात तिसरा यश मिळवले आहे. यावेळी उमरानने कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीकडून झेलबाद केलं. श्रेयसने बाद होण्यापूर्वी नऊ चेंडूत पंधरा धावा केल्या.

पाचवा झटका

पहिल्याच षटकात महागड्या ठरलेल्या नटराजनने दुसऱ्या षटकात शानदार पुनरागमन करत सात धावांत मोठी विकेट घेतली. त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगला एलबीडब्ल्यू आऊट केले. रिंकूने बाद होण्यापूर्वी सहा चेंडूंत पाच धावा केल्या.

नवा विक्रम, 2000 धावा

केकेआरचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम केला आहे. चेंडूंच्या बाबतीत तो सर्वात जलद 2000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

आंद्रेचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

34 साठी बिलिंग आऊट

भुवनेश्वर कुमारने आणखी एक किफायतशीर आणि यशस्वी षटक टाकले आणि त्याच्या कोट्यातील चार षटके पूर्ण केली. त्याने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर 34 धावांवर सॅम बिलिंग्सला विल्यमसनकडून झेलबाद केले.

सॅम बिलिंग्सचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हैदराबादला 178 धावांचं टार्गेट

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय