AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : जागा 2-दावेदार 4, पाकिस्तान सेमी फायनलच्या शर्यतीत, किती संधी? जाणून घ्या

Icc T20i World Cup 2026 Semi Final : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 पैकी 2 संघ निश्चित झाले आहेत. तर 2 संघ कोणते असणार? यासाठी एकूण 4 संघांमध्ये चुरस आहे. जाणून घ्या पाकिस्तानचं समीकरण.

T20i World Cup 2026 : जागा 2-दावेदार 4, पाकिस्तान सेमी फायनलच्या शर्यतीत, किती संधी? जाणून घ्या
Pakistan Cricket TeamImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 27, 2026 | 6:43 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर विजय मिळवला. या विजयासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उपांत्य फेरीतील दुसरा संघ निश्चित झाला. गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक दिली. तर त्याआधी इंग्लंडने सर्वात आधी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं होतं. दक्षिण आफ्रिका ए तर इंग्लंड बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील उर्वरित 2 जागांसाठी 4 संघांमध्ये चुरस आहे. ए ग्रुपमधून एका जागेसाठी टीम इंडियासह विंडीजमध्ये चुरस आहे. तर बी ग्रुपमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रस्सीखेच आहे. या निमित्ताने पाकिस्तानचं सेमी फायनलचं समीकरण जाणून घेऊयात.

सुपर 8 चं चित्र

सुपर 8 मधून श्रीलंका आणि झिंबाब्वेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर न्यूझीलंड, विंडीज, इंडिया आणि पाकिस्तान या 4 संघात 2 जागांसाठी चुरस आहे. या 8 संघांनी सुपर 8 फेरीत प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत.

पाकिस्तानला किती संधी?

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आलाय. न्यूझीलंडने 1 सामना जिंकलाय. तर पाकिस्तानने 1 सामना गमावलाय. त्यामुळे सुपर 8 मधील 2 सामन्यानंतर पाकिस्तानच्या खात्यात 1 तर न्यूझीलंडच्या खात्यात 3 पॉइंट्स आहेत.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

पाकिस्तान सुपर 8 फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेचं स्पर्धेतून पॅकअप झालंय. त्यामुळे श्रीलंकेसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र श्रीलंकेचा हा सामना जिंकून मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पाकिस्तानला सेमी फायनलसाठी आव्हान कायम ठेवायचं असेल तर त्यांना श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजयी व्हावं लागणार आहे. हा सामना शनिवारी 28 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचणार की नाही? हे इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालानंतर जवळपास स्पष्ट होईल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना 27 फेब्रुवारीला होणार आहे. न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्ध सुपर 8 मधील शेवटचा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरी गाठतील. त्यामुळे पाकिस्तानचं सेमी फायनलचं स्वप्न भंग होईल. मात्र इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं तर पाकिस्तानला फायदा होईल.

न्यूझीलंडचा इंग्लंड विरूद्ध पराभव झाल्यास आणि पाकिस्तानने श्रीलंकेवर मोठ्या फरकाने मात केल्यास दोन्ही संघांचे 3-3 समान गुण होतील. न्यूझीलंडचा पाकिस्तानपेक्षा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे न्यूझीलंड पराभवानंतरही उपांत्य फेरीत पोहचू शकते. त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केलं आणि शेजाऱ्यांनी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला तरच पाकिस्तान नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. न्यूझीलंडचा इंग्लंड विरुद्ध कमी फरकाने पराभव झाला तरी ते सेमी फायनलमध्ये पोहचतील.

पहिली गोष्ट म्हणजे सेमी फायनलच्या हिशोबाने पाकिस्तानच्या हातात फार काही नाही. पाकिस्तानचं समीकरण हे जर तरचं आहे. त्यामुळे पाकिस्तानची शक्यता कमी आहे, मात्र अशक्य नाही. पाकिस्तानची बॉलिंग साईड चांगली आहे. त्यामुळे पाकिस्तान बॉलिंगच्या जोरावर सामना जिंकू शकते.

टीम इंडिया-विंडीज उपांत्य पूर्व सामना

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सुपर 8 मधील आपला तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. तर पराभूत संघाचं पॅकअप होईल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक