IPL 2024 Captains : आयपीएल 2024 मधील सर्वात अनुभवी कर्णधार कोण?

IPL 2024 Captains | आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 10 पैकी 8 कर्णधार हे भारतीय आहेत, तर फक्त 2 परदेशी आहेत. 3 संघांनी कर्णधार बदललेत. एकाला नव्याने संधी मिळाली आहे. 3 संघांनी कर्णधार कायम ठेवले आहेत. तर तिघांचं दुखापतीनंतर कमबॅक झालंय. या 10 कर्णधारांपैकी सर्वात अनुभवी कोण?

IPL 2024 Captains : आयपीएल 2024 मधील सर्वात अनुभवी कर्णधार कोण?
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 10:46 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी अनेक संघांनी टीममध्ये बदल केले. एकूण 3 संघांनी आपले कर्णधार बदलले. तडकाफडकी कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. त्यामुळे आता या 17 व्या हंगामात अपवाद वगळता सर्वच युवा कर्णधार आहेत. तसेच या हंगामाआधी एका सुवर्ण युगाचा अंतही झाला आहे. त्यामुळे एका बाजूला हळहळ व्यक्त केली जातेय. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंना संधी मिळाल्याने आनंदही व्यक्त केला जातोय. या निमित्ताने आपण 17 व्या हंगामाआधी कोणत्या संघाने कर्णधार बदलले? तसेच सर्वात या मोसमातील अनुभवी कॅप्टन कोण? हे आपण जाणून घेऊयात.

विराट कोहली याने काही मोसमांआधीच नेतृत्व सोडलं होतं. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याच्याकडे असलेलं कर्णधारपद काढून ते हार्दिक पंड्या याला देण्यात आलं. तर 17 व्या सिजनच्या पूर्वसंध्येला चेन्नई सुपर किंग्सने चाहत्यांच्या काळजाला हात घालत कॅप्टन बदलला. महेंद्रसिंह धोनी याच्याकडे असलेल्या कॅप्टन्सीची जबाबदारी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली. तर सनरायजर्स हैदरबादाने एडन मारक्रमचा पत्ता कट करत ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता पॅट कमिन्स याच्याकडे धुरा सोपवली.

उर्वरित संघाचे कर्णधार कोण?

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सच्या हार्दिक पंड्या याला ट्रेड करत आपल्याकडे घेतलं. त्यामुळे आता शुबमन गिल याला गुजरातची कॅप्टन्सी मिळालीय. दुखापतीनंतर श्रेयस अय्यर याची एन्ट्री झालीय. त्यामुळे केकेआरची जबाबदारी श्रेयसने पुन्हा एकदा घेतलीय. तर नितीश राणा याला उपकर्णधार पदावर समाधान मानावं लागणार आहे.

दुखापतीनंतर कमबॅक केलेले कर्णधार

रस्ते अपघातानंतर ऋषभ पंत परतलाय. आता पंत दिल्ली कॅपिट्ल्सचे सूत्रं सांभाळणार आहे.डेव्हिड वॉर्नर याने 16 व्या हंगामात दिल्लीचं नेतृत्व केलेलं. तसेच लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुल हा देखील दुखापतीनंतर परतला आहे. कृणाल पंड्या याने केएलच्या अनुपस्थितीत गेल्या हंगामात नेतृत्व केलं होतं.

3 खेळाडू कर्णधारपदी कायम

तर 3 संघांनी आपल्या कर्णधारांवर विश्वास दाखवत त्यांना कायम ठेवलंय. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हाच असणार आहे. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन पंजाब किंग्संच कर्णधारपद सांभाळणार आहे.

श्रेयस अय्यर सर्वात अनुभवी कर्णधार

श्रेयस अय्यर याचंही दुखापतीनंतर कमबॅक झालंय. श्रेयस अय्यर हा 17 व्या हंगामातील इतर 9 जणांच्या तुलनेत अनुभवी कर्णधार आहे. श्रेयस अय्यर याने आयपीएलमध्ये 101 सामने खेळले आहेत. श्रेयसने 101 डावांमध्ये 31.55 च्या सरासरी आणि 125.38 च्या स्ट्राईर रेटने 2 हजार 776 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयसची 96 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रेयसला 55 सामन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....