AFG vs AUS Live Streaming: अफगाणिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, कोण जिंकणार?

Afghanistan vs Australia Super 8 T20 World Cup 2024 Live Match Score: अफगाणिस्तानसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सुपर 8 मधील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

AFG vs AUS Live Streaming: अफगाणिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, कोण जिंकणार?
| Updated on: Jun 22, 2024 | 5:40 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 मधील सामन्यात ग्रुप 1 मधील अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर राशिद खान अफगाणिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील दुसरा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला सामना जिंकला आहे. तर अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा करो या मरो असा असणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना केव्हा?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रविवारी 23 जून रोजी होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथे होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर डिज्नी पल्स हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने

ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, नॅथन एलिस आणि ॲश्टन एगर.

अफगाणिस्तान टीम: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, करीम जनात, मुजीब उर रहमान, मोहम्मद इशाक आणि नांगेलिया खरोटे.