
मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील सराव सामन्यामध्ये कांगारूंनी 14 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 351 धावांचा डोंगर उभारला होता. ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी 350 धावांचा टप्पा पार केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 50 ओव्हरमध्ये 337 धावाच करता आल्या. या सामन्यातील डेव्हिड वॉर्नर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा फक्त क्रिकेटरनसून रीलस्टारही म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. याची झलकही आज सर्व चाहत्यांना पाहायला मिळाली. साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ मधील गाण्यावर त्याने अनेक रीस्स बनवले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालेले पाहायला मिळाले होते. हैदराबादमध्ये झालेल्या सराव सामन्यामध्ये स्टेडिअममध्ये पुष्पा श्रीवल्ली गाणं लावताच वॉर्नर पुष्पा स्टाईल करू लागला.
I went straight to the stadium after finishing work early. Thanks, @davidwarner31, for the entertainment. #PAKvsAUS #CricketWorldCup2023” pic.twitter.com/XWTh6oxcQ6
— Aryan (@Aryan90007319) October 3, 2023
डेव्हिड वॉर्नर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. आपल्या संघातील सहकाऱ्यासोबत बोलताना गाण्याचे बोल कानावर पडताच भाऊने ठेका धरला होता. वॉर्नर याने आयपीएलमध्ये भारतीय चाहत्यांसोबत एक वेगळं नात तयार केलं आहे.
दरम्यान, या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर 48 धावा, लाबुशेन 40 धावा, ग्लेन मॅक्सवेल 77 धावा, कॅमेरून ग्रीन 50 धावा, जोश इंग्लिस 48 धावा केल्या. या फंलदाजांच्या जोरावर कांगारूंनी 350 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची खराब सुरूवा झाली. इफ्तियार अहमद 87 धावा, बाबर आझम 90 धावा आणि मोहम्मद नवाज 50 धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुर पडला.