‘आता माझी सटकली’, भर कार्यक्रमात Andrew Symonds चे शब्द ऐकून क्षणभरासाठी रितेश देशमुखही गांगरला

| Updated on: May 21, 2022 | 12:22 PM

अँड्र्यू सायमंड्स हा मैदानावर आणि मैदाबाहेर नेहमीच त्याचा उत्सफुर्त स्वभाव आणि आक्रमकतेसाठी ओळखला गेला. याच अँड्र्यू सायमंड्सचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

आता माझी सटकली, भर कार्यक्रमात Andrew Symonds चे शब्द ऐकून क्षणभरासाठी रितेश देशमुखही गांगरला
Andrew symonds ccl event
Image Credit source: fb screengrab
Follow us on

मुंबई: मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने (Andrew symonds) जगाचा निरोप घेतला. तो अवघ्या 46 वर्षांचा होता. कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्स हा मैदानावर आणि मैदाबाहेर नेहमीच त्याचा उत्सफुर्त स्वभाव आणि आक्रमकतेसाठी ओळखला गेला. याच अँड्र्यू सायमंड्सचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. ज्या मध्ये त्याने भारतीय रसिकांचं आपल्या खास स्टाइलमध्ये मनोरंजन केलं होतं. 2014 साली सायमंड्स भारतात आला होता. त्यावेळी सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या (Celebrity cricket League) कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. रितेश देशमुख, आयुषमान खुराना आणि बिपाशा बासू सोबत मिळून त्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. समोर प्रेक्षकांमध्ये सलमान खानसह बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात एका टप्प्यावर तो ‘आता माझी सटकली’ असं आक्रमकपणे बोलून गेला. त्यावेळी सायमंड्स खरोखर भडकला की, काय? असंच सगळ्यांना वाटलं. पण तो मस्करी करतोय, हे नंतर लक्षात आलं.

सलमानच्या गाण्यावर नाचला

बॉलिवूड चित्रपटांनी फक्त भारतातीलचं नव्हे, तर जगभरातील चित्रपट रसिकांना भुरळ घातलीय. बॉलिवूडचे चाहते परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत. अँड्र्यू सायमंड्सही याला अपवाद नव्हता. त्याला रितेश आणि आयुषमानने ड्रेसिंगरुममधील संवाद आणि बॉलिवूड चित्रपटांबद्दल काय वाटतं? असं विचारलं. त्यावर त्याने सलमान खानच्या गाजलेल्या ‘दबंग’ चित्रपटातील काही स्टेप्स करुन दाखवल्या. त्याशिवाय स्टेजवर आल्यानंतर सुरुवातीलाच त्याने अजय देवगणच्या गाजलेल्या सिंघम चित्रपटातील ‘आता माझी सटकली’ हे डायलॉग बोलून दाखवला होता. त्यामुळे सायमंड्सला हिंदी चित्रपटांबद्दलही बरीच माहिती होती.

हिंदी सिनेमाबद्दल त्याला काय वाटायचं?

हिंदी सिनेमाबद्दल बोलताना सायमंड्सने मला हिंदी चित्रपटात वापरले जाणारे रंग आणि नृत्य दिग्दर्शन आवडत असल्याचं त्याने सांगितलं होतं. सायमंड्न्स आयपीएलमध्ये डेक्कन चार्जस संघाकडूनही खेळला. भारतातही त्याची मोठी लोकप्रियता होती.

हे सुद्धा वाचा

कुठे अपघात झाला?

मागच्या आठवड्यात शनिवारी रात्रीच्यावेळी क्वीन्सलँडमधील एलिस रिव्हर ब्रिजजवळच्या हरवे रेंज रोडवर अँड्र्यू सायमंड्सच्या गाडीचा अपघात झाला. सायमंड्सची कार रस्ता सोडून पलटी झाली. त्यात सायमन्डसचा मृत्यू झाला. खरंतर अपघातानंतर शवविच्छेदन आणि अन्य सोपस्कार पूर्ण व्हायला जास्तीत जास्त एक ते दोन दिवस लागतात. पण अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूला आता आठवडा होत आला, तरी अजून त्याचं शवविच्छेदन झालेलं नाही.