IND vs PAK: भर मैदानात कार्तिककडून पंड्याला मानाचा मुजरा! महामुकाबल्यातील देखण्याक्षणाचा VIDEO

आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारताने काल पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे.

IND vs PAK: भर मैदानात कार्तिककडून पंड्याला मानाचा मुजरा! महामुकाबल्यातील देखण्याक्षणाचा VIDEO
Hardik-dinesh
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 29, 2022 | 10:24 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारताने काल पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. भारत-पाकिस्तान, (IND vs PAK) या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. कारण या सामन्यात क्रिकेट मधला रोमांच अनुभवायला मिळतो. अगदी शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा थरार या सामन्यात असतो. कालही तसंच घडलं. अगदी शेवटच्या षटकात सामन्याचा निकाल लागला. भारताने दोन चेंडू राखून सामना जिंकला. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारताच्या या विजयाचा नायक होता. रवींद्र जाडेजाने त्याला मैदानात मोलाची साथ दिली. पण हार्दिकने 19 व्या षटकात सामन्याच पारडं भारताच्या बाजूने झुकवलं. 20 व्या ओव्हर मध्ये थेट सिक्स मारुन त्याने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ते तीन चौकार निर्णायक ठरले

12 चेंडूत 21 धावांची गरज होती. हॅरिस रौफ 19 वी ओव्हर टाकत होता. त्या षटकात पंड्याने तीन चौकार मारले. पहिला चौकार मारताना अंदाज चुकला. पण चेंडू सीमारेषेपार केला. त्यानंतर मात्र दोन ठरवून कडक फोर मारले. तिथे सामना पाकिस्तानच्या हातून निसटला.

तो स्वत:ला रोखू शकला नाही

मोहम्मद नवाजच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारुन हार्दिकने विजय मिळवून दिला. हार्दिकला अखेरच्या षटकात साथ देण्यासाठी दिनेश कार्तिक मैदानात आला होता. हार्दिकचा षटकार पाहून तो स्वत:ला रोखू शकला नाही. कार्तिकने मैदानातच हार्दिकला मानाचा मुजरा केला. सामन्यातील या देखण्याक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.