
India-Pakistan Final Cricket Match Phalodi Betting : देशातील निवडणुका असो वा क्रिकेट सामना, फलोदी सज्जा बाजार त्याचे भाकीत अगोदरच वर्तवतो. आता आशिया कप 2025 मधील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान चषकासाठी भिडतील. या स्पर्धेत दोन्ही देश तिसऱ्यांदा आमने-सामने आहेत. 41 वर्षांनी आशिया कपमध्ये दोन्ही देश अंतिम सामन्यात धडकले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये या सामन्यांविषयी संतापाची भावना आहे. यापूर्वी दोन्ही सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले असले तरी त्याचा फार मोठा जल्लोष दिसला नाही. आशिया कप 2025 वर टीम इंडियाने बहिष्कार टाकायला हवा होता, अशी नागरिकांची भावना होती. पण बुकींना त्याच्याशी काहीच देणे घेणे नसल्याचे दिसून येते.
पारडे भारताच्या बाजूने झुकले
फलोदी सट्टा बाजाराने या सामन्याविषयी भाकीत केले आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या सूत्रांनी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ अंतिम सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे. सट्टा बाजार भारताच्या बाजूने आहे. भारताने यापूर्वी दोन्ही सामने खिशात घातले आहे. तर पाकिस्तानच्या संघाला म्हणावा तसा सूर सापडलेला नाही. परिणामी अंतिम सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानला लोळवेल असा बुकींचा दावा आहे.
मोबाईलवर सक्रीय फलोदी सट्टा बाजार
फलोदी सट्टा बाजारानुसार, भारताचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत संघ अव्वल आहे. संघाला फलंदाजीत लक्ष देणे गरजेचे आहे. यापूर्वी पाकला दोनदा आपटी दिल्याने बुकींना अंतिम सामन्यातही भारतीय संघ वरचढ ठरेल असेल असे वाटते. फलोदी सट्टा बाजार हा केवळ मोबाईलवरच सक्रीय असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी हा सट्टा बाजार खुल्या पद्धतीने खेळण्यात येत होता. आता हा बाजार इंटरनेट आणि मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे तो सक्रीय आहे.
पोलिसांचा बुकींना धाक
सट्टेबाजार पूर्णपणे अवैध आहे. काही ॲप्स, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल्सच्या माध्यमातून हा सट्टा चालवला जात असल्याची माहिती समोर येते. पण हा प्रकार गोपनिय पद्धतीने होत असल्याचे समजते. पोलिसांचा सारखा ससेमिरा आणि वेळोवेळी होणारी कारवाई यामुळे फलोदी सज्जाबाजार हा खुलेआम चालविण्यात येत नाही. त्यावर पोलिसांची करडी नजर असते. तर अनेकदा बुकी पोलीसांच्या जाळ्यात अलगद अडकतात. त्यामुळे हा प्रकार गुप्तपणे करण्यात येतो. ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात आहे. कायद्या सट्ट्याला परवानगी देत नाही. पण बाजाराचा कल कुणाकडे आहे आणि कौल कुणाला याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये असते. कारण त्यामुळे सामन्याचे पारडे कुणाकडे झुकते हे अगोदरच कळते.
डिस्क्लेमर : सदर माहिती फलोदीमधील सट्टेबाजी बाजारातील तज्ञांकडून आलेली आहे. टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारे सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.