AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी पायावर उभ्या राहणार; व्यवसायासाठी कर्ज मिळणार, हप्ते असे वळते होणार

Ladki Bahin Yojana Loan : लाडक्या बहिणींना निकषांना आणि ई-केवायसीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी पायावर उभ्या राहणार; व्यवसायासाठी कर्ज मिळणार, हप्ते असे वळते होणार
आता मिळणार कर्ज
| Updated on: Sep 27, 2025 | 9:29 AM
Share

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना निकषांना आणि ई-केवायसीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होत असताना राज्यातही लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

उद्योग-व्यवसायासाठी कर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBT अंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांना त्याचा लाभ मिळत आहे. तर इतर काही योजनांचा फायदा घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नसल्याचे सरकारने अगोदरच स्पष्ट केलेले आहे.

या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. या योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे. त्यांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी आहे.

2100 रुपयांचा हप्ता केव्हा?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये महिलांना प्रती माह 1500 रुपये अनुदान दिले जाते. लवकरच हे अनुदान 2100 रुपये करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण त्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या मिळणाऱ्या अनुदानातून कर्जाचे हफ्ते वसूल केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलनुसार, योजनेसाठी 1,12,70,261 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 1,06,69,139 अर्ज मंजूर झाले आहेत.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.