AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेरे! सचिन-सौरवसोबत खेळलेला खेळाडू पोटाची खळगी भरण्यासाठी विकतोय चहा

परिस्थिती कोणालाही काहीही करायला लावू शकते. एकेकाळी सचिन, सौरव आणि सेहवाग यासारख्या दिग्गजांना बोलिंग करणारा खेळाडू आज फुटपाथशेजारी चहा विकतोय...

अरेरे! सचिन-सौरवसोबत खेळलेला खेळाडू पोटाची खळगी भरण्यासाठी विकतोय चहा
प्रकाश भगत
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 6:14 PM
Share

सिल्चर : भारतीयासांठी जीवकी प्राण असणाऱ्या क्रिकेटने अनेकांचं आयुष्य बदललं. चांगला खेळ करणाऱ्या अनेकांच्या जीवनाला क्रिकेटने कलाटणी दिली. मग ते तिकीट चेकर महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) असो किंवा पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) अनेक सामान्य घरातील मुलांना क्रिकेटने कुठच्या कुठे उचलून ठेवलं. पण या सगळ्यांमध्ये एक असंही उदाहरण आहे कि एकेकाळी सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिन तेंंडुलकर ( Sachin Tendulkar) अशा अनेक दिग्गजांना गोलंदाजी करणारा फिरकीपटू आज पोट भरण्यासाठी रस्त्याशेजारी चहा विकतो आहे. (Assam Spinner Prakash Bhagat Who Bowled Sachin Tendulkar Sehwag Ganguly Now Selling tea For living)

ही दुर्देवी कहानी आहे आसाम संघाचा माजी फिरकीपटू प्रकाश भगत (Prakash Bhagat) याची. आसामकडून रणजी करंडक खेळणार्‍या प्रकाशने  एकेकाळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी अनेक दिग्गजांना गोलंदाजी करणाऱ्या प्रकाशने भारतीय क्रिकेटचा दादा अर्थात सौरव गांगुलीला ही नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. पण नंतर हव्या तशा संधी न मिळाल्याने आणि घरची परिस्थिती हालाखीची झाल्याने प्रकाशने क्रिकेट सोडले. आता तो आपले कुटुंब चालविण्यासाठी चहा विकत आहे.

…आणि क्रिकेट सोडले

2010 मध्ये आसाम संघातून रणी करंडक खेळलेल्या प्रकाशच्या वडिलांचे 2011 मध्ये  निधन झाले. त्यानंतर मात्र प्रकाशला क्रिकेट सोडून घरचे चालवत असलेल्या चाटच्या धंद्यात मदत करावी लागली. त्यानंतर मोठ्या भावाला मदत करणाऱ्या प्रकाशवर आता कोरोनाच्या संकटात आणखीच हालाखिची परिस्थितीत आली असून आता त्याला चहा विकावा लागतो आहे.

Cricketer Prakash Bhagat Selling Tea

प्रकाश भगत चहा विकताना

हे ही वाचा :

नागपुरातील राष्ट्रीय खेळाडूवर फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ, मायबाप सरकार मदतीचा हात द्या!

तगड्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण, सलामी कसोटी सामन्यातच 10 विकेट, मग 30 वर्षाच्या वयात हत्‍या

दर्जा! अशी चिवट फलंदाजी पाहिली नसेल, 104 ओव्हरमध्ये केवळ 122 धावा, एकाच खेळाडूने खेळले 278 चेंडू

(Assam Spinner Prakash Bhagat Who Bowled Sachin Tendulkar Sehwag Ganguly Now Selling tea For living)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल