AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर्जा! अशी चिवट फलंदाजी पाहिली नसेल, 104 ओव्हरमध्ये केवळ 122 धावा, एकाच खेळाडूने खेळले 278 चेंडू

टी-20 क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी जशी महत्त्वाची असते. त्याउलट चिवट कसोटी क्रिकेटमध्ये संयमी फलंदाजी गरजेची असते. अशाच संयमी फलंदाजीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

दर्जा! अशी चिवट फलंदाजी पाहिली नसेल, 104 ओव्हरमध्ये केवळ 122 धावा, एकाच खेळाडूने खेळले 278 चेंडू
हाशिम अम्ला
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 12:33 PM
Share

लंडन : मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये अनेक बदल झाले आहेत. सध्या धडाकेबाज खेळी करुन फटाफट धावा करण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात बहुतांशी लीगही 20 ओव्हरच्याच असल्याने त्यात तुफान फलंदाजी करणेच गरजेचे असते. पण मागील वर्षभरात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यामुळे पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटबद्दल क्रिकेटप्रेमींच्या मनात आवड निर्माण झाली आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांना कसोटी मालिकेत संयमी खेळी करुनच मात दिली होती. अशाच एक दर्जेदार संयमी खेळी पुन्हा एकदा इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये दिसून आली.

दक्षिण आफ्रीकेचा माजी दिग्गज फलंदाज हाशिम अम्ला (Hashim Amla) याने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये (County Championship)  सरे आणि हँपशर यांच्यात साऊदम्पटनच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात अप्रतिम चिवट खेळीचे दर्शन घडवले. हँपशर संघाने पहिल्या डावांत 488 धावा केल्या. त्याच्या प्रतित्यूरात सरेचा संघ 72 धावांवर ऑलआऊट झाला. सरेला फॉलोऑन खेळावा लागला आणि त्यांचा पराभव निश्चित होता.  पण हाशिम अम्लाच्या अप्रतिम फलंदाजीला इतरांनी साथ देत दुसऱ्या दिवशी मॅच संपवण्याजागी ओव्हर्स खेळून काढल्या. ज्यामुळे अखेर सामना ड्रॉ झाला.

हाशिम अम्लाची संयमी खेळी

टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्येसाठी प्रसिद्ध हाशिम अम्लाने संपूर् आंतरराष्ट्रीय अनुभव या सामन्यात वापरला आणि 9 ओव्हरमध्ये 6 धावांवर 2 विकेट्स पडल्या असताना हाशिम क्रिजवर टिकून राहिला आणि दिवसभर फलंदाजी करुन 278 चेंडूत केवळ 37 रन करत चिवट फलंदाजी केली. त्याने 5 चौकार देखील लगावले. शेवटपर्यंत नाबाद रहात हाशिमने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले

104 ओव्हरच्य खेळात केवळ 122 धावा

या सामन्यात हाशिमसोबत इतर फलंदाजानी देखील आपल्या परीने प्रयत्नांची शिकस्त करत संयमी फलंदाजी केली. त्यामुळे सरे संघाने तब्बल 104.5 ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. ज्यात त्यांनी केवळ 122 दावा केल्या. विशेष म्हणजे 63 ओव्हरतर मेडन पडल्या.

हे ही वाचा :

कधी अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या खेळाडूने ठोकलं दुहेरी शतक, भारतीय संघावर मिळवला दमदार विजय

भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई

IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश

(In Country Championship Match Hashim Amla Did Top Class Slow Batting With 37 in 278 balls)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.