तगड्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण, सलामी कसोटी सामन्यातच 10 विकेट, मग 30 वर्षाच्या वयात हत्‍या

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीच्या सामन्यात 10 विकेट्स घेत दमदार पदार्पण करणाऱ्या खेळाडूची 30 वर्षाचा असताना हत्या झाली.

तगड्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण, सलामी कसोटी सामन्यातच 10 विकेट, मग 30 वर्षाच्या वयात हत्‍या
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 1:48 PM

मुंबई :  प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण हे सर्वात मोठं स्वप्न असतं. त्यात पदार्पणाच्या सामन्यातच जर त्याने अप्रतिम कामगिरी केली तर बातच काही और…अशीच गोष्ट इंग्लंडचा वेगवान गोलंदाज केन फारनेस (Ken Farnes) यांच्याबद्दल घडली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पणात फारनेसने 10 विकेट्स पटकावल्या. पण त्याची दमदार सुरुवात झालेली कारकिर्द फार काळ टिकली नाही आणि अवघ्या 30 वर्षाचा असताना त्याची हत्या करण्यात आली. याच दुर्देवी क्रिकेटपटूचा आज वाढदिवस असून नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊ…इं

केन फारनेस यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 8 जुलै, 1911 रोजी झाला होता. फारनेस यांनी इंग्‍लंड (England Cricket Team) संघाकडून ऑस्‍ट्रेलिया संघाविरुद्ध 1934 साली ट्रेंटब्रिजच्या कसोटीमध्ये पदार्पण केले. त्यांनी पहिल्या डावात 40.2 ओव्हरमध्ये 10 मेडन ओव्हर टाकत 102 रन दिले आणि सोबत 5 विकेट मिळवल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 25 ओव्हरमध्ये 3 मेडन टाकत 77 रनांच्या मोबदल्यात 5 विकेट मिळवले. पण यानंतर काही वर्षांनी अवघ्या 30 वर्षाच्या वयात त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी जगात दुसरे विश्व-युद्ध सुरु होते आणि त्याचदरम्यान फारनेस यांची युद्धादरम्यान हत्या कऱण्यात आली.

168 सामन्यांत 690 विकेट

केन फारनेस यांनी इंग्‍लंडकडून 15 आंतरराष्ट्रीय टेस्‍ट सामने खेळले. यात  27 डावांत त्यांनी 60 विकेट मिळवले. यात त्यांचे एका डावात 96 रन देऊन 6 विकेट मिळवणे हे सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन होते. तर संपूर्ण सामन्याचा विचार करता 179 धावांच्या बदल्यात 10 विकेट हे त्यांचे सर्वश्रेष्‍ठ प्रदर्शन ठरले. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 168 मॅचमध्ये तब्बल 690 वेळा फलंदाजाना तंबूत धाडलं. त्यात एका डावात 38 धावांच्या बदल्यात 8 विकेट हे त्यांचे सर्वात उत्तम प्रदर्शन होते.

हे ही वाचा :

दर्जा! अशी चिवट फलंदाजी पाहिली नसेल, 104 ओव्हरमध्ये केवळ 122 धावा, एकाच खेळाडूने खेळले 278 चेंडू

कधी अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या खेळाडूने ठोकलं दुहेरी शतक, भारतीय संघावर मिळवला दमदार विजय

भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई

(Former England Cricketer Ken Farnes Birthday Today)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.