AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 3: इंग्लंड बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने भेदक मारा करत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॅथन लेयॉनने तीन विकेट घेतल्या.

AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 3: इंग्लंड बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 5:30 PM
Share

मेलबर्न : अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes series) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसअखेरीस ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 45 धावा झाल्या असून त्यांच्याकडे 282 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. इंग्लंडसाठी परिस्थिती अधिक खडतर झाली आहे. त्यांचा पहिला डाव 236 धावात आटोपला.

इंग्लंडंकडून डेविड मलान आणि जो रुट यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. बेन स्टोक्स (34) आणि ख्रिस वोक्स (24) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मलानने सर्वाधिक (80) आणि रुटने (62) धावा केल्या. दोघांनी दोन बाद 17 वरुन सकाळी डाव पुढे सुरु केल्यानंतर आश्वासक फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 138 धावांची भागीदारी केली.

रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने भेदक मारा करत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॅथन लेयॉनने तीन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीवर डेविड वॉर्नर 13 धावांवर स्वस्तात रनआऊट झाला. हॅरिस आणि नेसार खेळपट्टीवर आहेत. ऑस्ट्रेलिया उद्या वेगाने धावा करुन इंग्लंडला फलंदाजीची संधी देईल. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड 1-0 ने पिछाडीवर आहे.

रुटने तेंडुलकर-गावस्करांना टाकलं मागे इंग्लिश कॅप्टन जो रुटचं (Joe root) कसोटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. कसोटी सामने खेळताना रुटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. शनिवारी अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना रुटने भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आणि सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांचा एकवर्षात सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये (England vs Australia) दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रुटने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या :

Ind vs SA: रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? प्रश्नाचं उत्तर मिळालं, ‘या’ खेळाडूवर सोपवली जबाबदारी IND vs SA: द्रविड-विराटच्या टीममध्ये झाला जोरदार सामना, दक्षिण आफ्रिकेत दिसला ‘चक दे इंडिया’चा सीन न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...