Ind vs SA: रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? प्रश्नाचं उत्तर मिळालं, ‘या’ खेळाडूवर सोपवली जबाबदारी

Ind vs SA: रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? प्रश्नाचं उत्तर मिळालं, 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी
व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटवरुन कर्णधार ठरवण्यात आल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलंय

रोहित आता वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे, तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीला कायम ठेवण्यात आलं आहे. टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती, पण...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 18, 2021 | 2:31 PM

जोहान्सबर्ग: रोहित शर्मा (Rohit sharma) दुखापतग्रस्त झाल्याने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (South africa tour) उपकर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने तो आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत NCA मध्ये रोहित शर्मा फिटनेसवर मेहनत घेत आहे. मागच्या आठवड्यात वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहितची निवड करण्यात आली.

रोहित आता वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे, तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीला कायम ठेवण्यात आलं आहे. टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. पण रोहित दुखापतग्रस्त झाल्याने उपकर्णधारपद कोणाकडे सोपवणार? अशी चर्चा सुरु होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळाल आहे. निवड समितीने लोकेश राहुलवर विश्वास दाखवला आहे. के.एल.राहुलला संघाच्या उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे.

उपकर्णधारपदासाठी बीसीसीआयसमोर अनेक पर्याय होते. वेगवेगळ्या नावांवरुन तर्क लढवले जात होते. पण अखेरीस लोकेश राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अजिंक्य रहाणे बऱ्याच काळासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार होता. पण मागच्या काही काळातील खराब कामगिरीमुळे अजिंक्यला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. त्याजागी रोहितची निवड करण्यात आली. पण रोहित दुखापतग्रस्त असल्याने नवीन उपकर्णधार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता.

कसोटी मालिकेत डावाला चांगली सुरुवात मिळाली, तर मोठी धावसंख्या उभारता येते. केएल राहुलवर चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हाच सूर कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मयांक आणि राहुल दोघे डावाची सुरुवात करु शकतात.

संबंधित बातम्या:
IND vs SA: द्रविड-विराटच्या टीममध्ये झाला जोरदार सामना, दक्षिण आफ्रिकेत दिसला ‘चक दे इंडिया’चा सीन

न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती

Ashes series 2021: इंग्लिश कॅप्टन रुटची टेस्टमध्ये जबरदस्त कामगिरी, तेंडुलकर, गावस्करांना टाकलं मागे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें