Ashes series 2021: इंग्लिश कॅप्टन रुटची टेस्टमध्ये जबरदस्त कामगिरी, तेंडुलकर, गावस्करांना टाकलं मागे

इंग्लिश कर्णधार रुट या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतात भारताविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत रुटने सर्वाधिक धावा केल्या. यात एका द्विशतकाचाही समावेश आहे.

Ashes series 2021: इंग्लिश कॅप्टन रुटची टेस्टमध्ये जबरदस्त कामगिरी, तेंडुलकर, गावस्करांना टाकलं मागे
Joe Root
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:55 AM

अ‍ॅडलेड: इंग्लिश कॅप्टन जो रुटचं (Joe root) कसोटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. कसोटी सामने खेळताना रुटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. शनिवारी अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना रुटने भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आणि सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांचा एकवर्षात सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये (England vs Australia) दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रुटने ही कामगिरी केली.

कॅलेंडर वर्षात इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम रुटने आधीच आपल्या नावावर केला आहे. रुटने इंग्लिश फलंदाज मायकेल वॉन यांच्या नावावर असलेला हा विक्रम मोडला. वॉनने वर्ष 2002 इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1481 धावा केल्या होत्या. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रुटने सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला.

गावस्कर यांनी 1979 साली 1,555 आणि सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये कॅलेंडरवर्षात सर्वाधिक 1,562 धावा केल्या होत्या. तेंडुलकरला मागे टाकल्यानंतर एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रुट पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रुटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकारा यांना एकावर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्यामध्ये मागे टाकले.

इंग्लिश कर्णधार रुट या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतात भारताविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत रुटने सर्वाधिक धावा केल्या. यात एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने एकूण सहा शतके झळकवली असून यात एक द्विशतक आहे. या वर्षात कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी 65 आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. 2006 साली 11 सामन्यात त्याने 1,788 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस यांनी 1976 साली 11 सामन्यात 1,710 धावा फटकावल्या होत्या. युसूफचा रेकॉर्ड मोडण्यासाठी जो रुटला आणखी तीन डावात फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.

#Ashesseries2021 #EnglandvsAustralia

संबंधित बातम्या:

‘किंग कोहली का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’, #WorldStandsWithKohli ट्रेंडिंगमध्ये ओमिक्रॉनचा वाढता धोका! नवी मुंबईच्या एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, चिंता वाढली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?, शिवसेनेच्या खासदाराचा अशोक चव्हाणांना सवाल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.