AUS vs IND : तिसऱ्या मॅचमध्ये पावसाचा विजय, गाबा कसोटी अनिर्णित, टीम इंडिया सामना बचावण्यात यशस्वी, बुमराहची निर्णायक कामगिरी

Australia vs India 3rd Test Match Result : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. पावसामुळे पाचव्या दिवशी पूर्ण खेळ होऊ शकला नाही.

AUS vs IND : तिसऱ्या मॅचमध्ये पावसाचा विजय, गाबा कसोटी अनिर्णित, टीम इंडिया सामना बचावण्यात यशस्वी, बुमराहची निर्णायक कामगिरी
team india test rohit sharma
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 19, 2024 | 12:28 AM

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा ड्रॉ झाला आहे. सामन्यातील पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे काही वेळ प्रतिक्षा केल्यानंतर दोन्ही संघांच्या संमतीने इथेच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे हा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे आता या 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचा धावता आढावा

कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 445 धावांपर्यंत मजल मरली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 260 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 185 धावांची मोठी आघाडी मिळाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात धमाका केला. ऑस्टेलियाला झटपट 7 झटके दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची बिकट स्थिती झाली. मात्र 89 धावांनंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव हा घोषित केला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाला विजयासाठी 275 धावांचं आव्हान मिळालं. भारताने 2.1 ओव्हरमध्ये बिनबाद 8 धावा केल्या. मात्र त्यानंतर खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. अनेक मिनिटांच्या विश्रांतीनंतर अखेर सामना अनिर्णित राहिल्याचं जाहीर करण्यात आलं.

तिसऱ्या सामन्यात पावसाचा विजय


तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.